• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • भिवंडीतील 28 गावातील शेकडो टेम्पो चालक-मालकांवर उपासमारीचे संकट, मनसेचा एल्गार; अविनाश जाधव आक्रमक

भिवंडीतील 28 गावातील शेकडो टेम्पो चालक-मालकांवर उपासमारीचे संकट, मनसेचा एल्गार; अविनाश जाधव आक्रमक

भिवंडी तालुक्यातील तब्बल 28 गावातील शेकडो भूमिपुत्र तथा टेम्पो चालक-मालकांवर ऑनलाईन ट्रान्सपोर्टमुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे.

  • Share this:
भिवंडी, 31 ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठा गोदाम व्यवसाय असलेल्या भिवंडी तालुक्यातील तब्बल 28 गावातील शेकडो भूमिपुत्र तथा टेम्पो चालक-मालकांवर ऑनलाईन ट्रान्सपोर्टमुळे उपासमारीचे संकट ओढावले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून लॉकडाऊनच्या संकटानंतर हे दुसरे संकट आलं असल्याने जागा, जमीन विकून आणि कर्ज काढून घेतलेले टेम्पोचे पैसे फेडायचे कसे? टेम्पो व्यवसाय करायचा कसा आणि आता कुटुंबाला जगवायचे कसे? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. भिवंडी तालुक्यातील कशेळी, काल्हेर, कोपर, पुर्णा, राहनाळसह  28  गावातील  भूमिपुत्रांच्या  गोदामातील मालाची वाहतूक टेम्पोच्या माध्यमातून करण्याचा व्यवसाय गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सुरू आहे.  मात्र ऑनलाईन ट्रान्सपोर्टमुळे बाहेरची वाहने थेट येथील गोदामातील मालाची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे येथील भूमिपुत्रांचे टेम्पो धूळ खात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर उपासमारीचे संकट आलेल्या भूमिपुत्रांच्या पाठीशी आता मनसे उभी राहिली आहे. काल्हेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका  जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करते वेळी मनसे पालघर जिल्हाध्यक्ष  अविनाश जाधव यांनी ऑनलाईन ट्रान्सपोर्टमुळे भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाहीं यासाठी शासनाशी लढा उभारू असे आश्वासन टेम्पो चालक - मालक यांना दिले. यावेळी भिवंडी लोकसभेचे जिल्हा सचिव संजय पाटील ,भिवंडी तालुका अध्यक्ष  शिवनाथ भगत , मनविसे तालुका अध्यक्ष संतोष भगवान म्हात्रे,  वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष रोहिदास पाटील , विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष साळवी , महिला सेनेचे जिल्हा अध्यक्षा  कामिनाताई खंडागळे , माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष भारत पाटील , तसेच मनसेचे तालुका सचिव शरद नागावकर , विद्यार्थी सेनेचे माजी तालुका अध्यक्ष कुलेश तरे , भिवंडी लोकसभा प्रसिद्धी प्रमुख मिलिंद तरे , तालुका संघटक संतोष पाटील , उपतालुका अध्यक्ष महेंद्र पाटील   स्थानिक विभाग अध्यक्ष जगदिप घरत , महेंद्र पाटील कुलेश तरे, अजित म्हात्रे,  देवेंद्र पाटील, जगदीश घरत,  -विभाग अध्यक्ष संतोष पाटील, प्रतीक पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील यांच्यासह  मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो टेम्पो मालक चालक , शेअर रिक्षा चालक मालक उपस्थित होते.
Published by:Akshay Shitole
First published: