संगमनेरमध्ये कापसाचा टेम्पो ओढ्यात पलटला, 3 तरुणांचा जागीच मृत्यू

संगमनेरमध्ये कापसाचा टेम्पो ओढ्यात पलटला, 3 तरुणांचा जागीच मृत्यू

संगमनेर तालुक्यातील आश्वीजवळील हंगेवाडी - ओझर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी झाला.

  • Share this:

संगमनेर, 13 डिसेंबर : कापसाचा टेम्पो पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वीजवळील हंगेवाडी - ओझर रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यामध्ये मालवाहू कापसाचा टेम्पो पलटी झाला. यामध्ये असलेल्या 3 मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडकीस आहे. पोलीस सध्या अपघाताची तपासणी करत आहेत.

या अपघातात परवेज शेख, जुनेद शेख, फरहान शेख या तिंघाचा टेम्पोखाली दबुन मृत्यू झाला. नाशिकमध्ये असलेल्या एका व्यापाऱ्याचा कापूस भरण्यासाठी जामनेर येथून टेम्पो (क्र. एमएच 18 एम 8619) चा चालक वसीम नजीर शेख हा आश्वी परिसरातील हंगेवाडी या ठिकाणी आला होता. कापूस भरून पुन्हा हा टेम्पो हंगेवाडी-ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्यानो त्याच दरम्यान टेम्पो थेट ओढ्यामध्ये पलटी झाला.

इतर बातम्या - पत्नी जीन्स घालायची म्हणून चढायचा पारा, रागात पतीने आवळला गळा पण...!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ओढ्यामध्ये पाणीही होते. त्यामुळे टेम्पोखाली परवेज शेख, जुनेद शेख, शेख फरहान हे तिघेजण दबल्याने तिघाही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटेनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाती टेम्पो ओढ्यातून बाजूला करत तिघांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले असून याची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.

महामार्गावर वारंवार वाहनांचे अपघात होत असतात. मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारची पूढे जाणार्‍या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास ओझर्डै गावाजवळ हा अपघात झाला. महेश कदम अशी मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे तर संतोष भोसले आणि प्रवीण कोकाटे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांकडून तात्काळ जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

Published by: Renuka Dhaybar
First published: December 13, 2019, 9:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading