मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रखरखत्या उन्हाने होणार एप्रिलचं स्वागत; महाराष्ट्रासह उत्तर भारतात आग ओकणार सूर्य

रखरखत्या उन्हाने होणार एप्रिलचं स्वागत; महाराष्ट्रासह उत्तर भारतात आग ओकणार सूर्य

Latest Weather Update: गेल्या आठ दिवसांत महाराष्ट्रासह उत्तर भारत आणि वायव्य भारतात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. काल विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला होता. येथील तापमान 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मार्च: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची (Low pressure area) तीव्रता कमी झाल्यानंतर, महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा वाढला (temperature in maharashtra) आहे. गेल्या आठ दिवसांत महाराष्ट्रासह उत्तर भारत आणि वायव्य भारतात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. काल विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला होता. येथील तापमान 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. वाढत्या तापमानामुळे नागरिक देखील कमालीचे हैराण होतं आहे. एप्रिल महिन्यात देखील सूर्याची ही दाहकता कायम राहणार आहे. रखरखत्या उन्हाने एप्रिल महिन्याचं स्वागत होणार आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रासह उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतेक भागांत, मध्य भारत, पूर्वोत्तर भारताच्या काही भागांत सरासरी पेक्षा अधिक कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात संबंधित भागातील नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हेही वाचा-संत्र्यापेक्षा पाचपट व्हिटॅमिन सी असलेलं हे फळ उन्हाळ्यात खायला विसरू नका दुसरीकडे दक्षिण भारत, पूर्व भारतातील बहुतांशी ठिकाणी, पूर्वोत्तर भारत आणि लगतच्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी कमाल तापमानाची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित देशाच्या तुलनेत या भागातील नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काही दिवसांत दिवसा आणि रात्रीच्या वेळी देखील उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच दिवसा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उष्माघातासारख्या समस्या जाणवत आहेत. आजपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट (heat wave) कायम राहणार आहे. हवामान खात्याने आज सोलापूर, अहमदनगर, परभणी, जालना, हिंगोली, बुलडाणा, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा देण्यात आला असून या जिल्ह्यांत येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी उन्हाचा चटका वाढला होता. उद्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात सूर्य आग ओकणार आहे. उद्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Mumbai, Weather forecast

    पुढील बातम्या