राज्यात अनेक शहरांनी चाळीशी ओलांडली, बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2017 02:04 PM IST

राज्यात अनेक शहरांनी चाळीशी ओलांडली, बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

29 मार्च :  गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. अनेक शहरांच्या तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. यातच बीडमध्ये या उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. केज तालुक्यातील नांदूरघाट इथल्या ६७ वर्षाच्या रुपाबाई पिसळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईसह मराठवाडा, विदर्भ सध्या कडाक्याचा उकाडा आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे. काल गुढी पाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

पुणे, जळगाव, मालेगाव, सोलापूर यांच्यासह नाशिक आणि सातारा इथेही कमाल तापमान ४० अंश से. वर पोहोचले. मराठवाडा व विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमान 40  अंश से. वर राहिले. त्यामानाने कोकणातील कमाल तापमान मंगळवारी काहीसे कमी झाले होते.

दरम्यान, जगभरातल्या तापमानात वाढ होतीये. विशेषत: कोलकत्यासारखी शहरे तर या उष्णतेच्या लाटेत होरपळणार असल्याचा इशाराही संशोधकांनी दिला आहे. 2015 मध्ये कोलकाता शहरात 2 हजार नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पॅरिस कराराचे पालन न केल्यास जागतिक तापमानवाढ होतच राहणार असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2017 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...