अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या चौकशीला नवं वळण, ज्याच्यावर केलं प्रेम त्यानेच दिला धोका

अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या चौकशीला नवं वळण, ज्याच्यावर केलं प्रेम त्यानेच दिला धोका

पोलिसांनी नागाच्या प्रियकराला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. न्यायालयाने सूर्याला दोन आठवड्यांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • Share this:

हैदराबाद, १४ फेब्रुवारी २०१९- तेलगू अभिनेत्री नागा झांसीने गेल्या बुधवारी तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सध्या पोलीस या आत्महत्येची चौकशी करत असून त्यामागचं कारण शोधून काढत आहेत. या सर्व प्रकरणात समोर आलेली माहिती फार धक्कादायक आहे.

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागा झांसीने तिचा प्रियकर सूर्या तेजाच्या त्रासामुळे आणि फसवणूक केल्यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नागाच्या प्रियकराला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. न्यायालयाने सूर्याला दोन आठवड्यांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या मते, नागाच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबाने सूर्याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतरच सूर्याला अटक करण्यात आलं. सूर्याचं स्वतःचं मोबाईलचं एक दुकान आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नागा आणि सूर्याची ओळख झाली. अगदी थोड्या काळात दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाली. झांसीने जुलै महिन्यात आपल्या कुटुंबाला सूर्याबद्दल सांगितले आणि त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढंच नाही तर नागाने त्याला एक बाइकही गिफ्ट म्हणून दिली होती.

प्रेमप्रकरण जेव्हा लग्नापर्यंत पोहोचले तेव्हा सूर्याने नागाला अभिनय क्षेत्र सोडण्यास सांगितलं. नागाने त्याची ही अटही मान्य केली आणि तिने स्वतःचं एक ब्यूटी पार्लर सुरू केलं. एवढं होऊनही सूर्या तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिच्यावर त्याच्या मित्रांशी बोलण्याचा आरोपही लावायचा. हळूहळू सूर्याने तिला वेळ देणं कमी केलं.

याच सगळ्या परिस्थितीला कंटाळून नागाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सूर्याने नागाच्या कुटुंबियाने त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. वयाच्या २१ व्या वर्षी नागाने आत्महत्या केली. श्रीनगर येथील राहत्या घरी तिचं पार्थिव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलं. नागा तेव्हा घरात एकटी होती. तिचा भाऊ दुर्गा प्रसादने दरवाजा वाजवला तेव्हा आतमधून कोणताही आवाज आला नाही. यानंतर दुर्गा प्रसादने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. सगळ्यांनी मिळून दरवाजा तोडला तेव्हा नागाचं पार्थिव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसलं. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्या झांसीने ‘मा’ टीव्ही वाहिनीवर येणाऱ्या ‘पवित्र बंधन’ मालिकेशिवाय अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

VIDEO पुलवामा हल्ल्याचा हा आहे आत्मघाती हल्लेखोर, आणखी स्फोटाची धमकी

First published: February 14, 2019, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading