नागिनच्या सेटवरील अभिनेता कोरोनाच्या विळख्यात, स्वत:ला केलं होम क्वारंटाइन

नागिनच्या सेटवरील अभिनेता कोरोनाच्या विळख्यात, स्वत:ला केलं होम क्वारंटाइन

टेलिव्हिजनवरील शो नागिन 5 फेम अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची हलकी लक्षणं आढळल्याने त्याने कोरोना चाचणी केली होती.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो नागिन 5 फेम Naagin 5 अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह COVID 19 test positive आला आहे. टेलिव्हिजन अभिनेता शरद म्हल्होत्राला Sharad Malhotra कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची हलकी लक्षणं आढळल्याने त्याने कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर आता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्याने स्वत:ला होम क्वारंटाईन Home Quarantine केलं आहे. शरद मल्होत्राच्या पत्नीचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र शरदच्या पत्नीचा रिप्सी भाटियाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

View this post on Instagram

#coffee is a hug in a Mug  ...Sweeeeeethearttttt wherz Urs ..

A post shared by Sharad_Malhotra009 (@sharadmalhotra009) on

'कोरोनाची हलकी लक्षणं आढळल्यानंतर माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्या पत्नीची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. सर्व योग्य त्या उपाययोजनांचं मी पालन करत आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली होम क्वारंटाईन असल्याचं' शरद मल्होत्राने सांगितलं. चाहत्यांना त्याने आपल्यासाठी प्रार्थना करण्याचं सांगतिलं असून पुन्हा लवकरच वापसी करण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद मल्होत्राचा मित्र विकास कलंत्री आणि त्याची पत्नी प्रियंका कोरोना पॉझिटिव्ह आले होते. कोरोना चाचणी करण्यापूर्वी विकास आणि त्याच्या पत्नी, शरद मल्होत्राची भेट घेतली होती.

Published by: Karishma Bhurke
First published: October 3, 2020, 1:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या