Home /News /news /

BREAKING: सर्वात मोठी बातमी, या राज्याने 29 मेपर्यंत वाढवला Lockdown

BREAKING: सर्वात मोठी बातमी, या राज्याने 29 मेपर्यंत वाढवला Lockdown

Thane: Carts chained near the residence of a hawker during ongoing COVID-19 lockdown, in Thane, Thursday, April 16, 2020. The 40-day country-wide lockdown may prevent the spread of coronavirus, but the measure would bring a "financial epidemic" on five crore families of hawkers and those who supply them with products, an official of the national hawkers' body said. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI16-04-2020_000176B)

चवथ्यांदा लॉकडाऊन वाढवणारं तेलंगणा हे देशातलं पहिलच राज्य आहे.

    हैदराबाद 05 मे: देशात तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपायला आता काही दिवस राहिलेले असतानाच तेलंगणाने चवथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यातल्या लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तेलंगणात आज 11 नवीन रुग्ण सापडले असून राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 1096 वर गेली आहे. चवथ्यांचा लॉकडाऊन वाढविणारं तेलंगणा हे पहिलच राज्य आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.  हे वाचा - वडिलांनी घरीच प्राण सोडला, वेटिंग असल्याने 19 दिवसांनी झाले अंत्यसंस्कार तर सोशल डिस्टन्सिंगसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे नियम जाहीर केले आहे. त्यात लग्नासाठी फक्त 50 जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन संपायला वेळ असला तरी सरकारने काही नियमांमध्ये सुट द्यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन 3.0 हा 17 मे रोजी संपणार आहे. लॉकडाऊन किती काळ ठेवावा यालाही मर्यादा असल्याने सरकारने थोडी सूट द्यायला सुरुवात केली आहे.  हे वाचा - लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 माणसांनाच परवानगी, गृहमंत्रालयाचे नवे नियम केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने आज नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार काही अटींवर लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार लग्नासाठी 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी दिली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या