Home /News /news /

जीव धोक्यात घालून जवानानं वाचवले श्वानाचे प्राण, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

जीव धोक्यात घालून जवानानं वाचवले श्वानाचे प्राण, VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

या श्वानाला होमगार्ड जवानानं आपला जीव धोक्यात घालून वाचवलं आहे.

    हैदराबाद, 17 सप्टेंबर : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान एका जवानानं आपला जीव धोक्यात घालून श्वानाचे प्राण वाचवल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आणि गावांमध्ये पाणी शिरलं. माणसं एकमेकांच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकली मात्र प्राणी-मात्रांचे हाल झाले. अशातच एक श्वान पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होता. या श्वानाला एका फांदीचा आधार मिळाल्यानं तो अडकून पडला होता. मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करत होता मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्यानं बिथरलेल्या अवस्थेत श्वानाचा आवाज फुटेना. हे वाचा-Fact Check : खरंच सुधा मूर्ती वर्षातून एकदा मंदिराबाहेर भाजी विकतात? या श्वानाला होमगार्ड जवानानं आपला जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. महापुरातून या श्वानाचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचं खूप कौतुक होत आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांना मोठा फटका बसल्यानं श्वानही यामध्ये सापडला होता.त्याला वाचवण्यात यश आलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता जेसीबी आणि जवान या कुत्र्याला वाचवण्याचे कशा पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. ही घटना तेलंगणा राज्यातील नागरकुर्नूल परिसरातील आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बुधवारी मुसळधार पावसानं झोडपल्यानं तिथेही अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. हे वाचा-एका क्षणात पत्त्यासारखी कोसळली शाळा, VIDEO पाहून अंगावर येईल काटा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरात पाण्यातून वाहतूक करू नका असं ग्रामस्थ सांगत असतानाही एका कारचालकानं कार नेली आणि पाण्यासोबत ही कार वाहून गेल्याची घटना घडली होती. ही कार गुरुवारी सकाळी एका झाडाला अडकल्यामुळे सुदैवानं सापडली. यामध्ये दोन जण होते. त्यापैकी एक जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Telangana

    पुढील बातम्या