बिहारमध्येही आरजेडी करणार सरकार स्थापनेचा दावा,भाजपची डोकेदुखी वाढणार

बिहारमध्येही आरजेडी करणार सरकार स्थापनेचा दावा,भाजपची डोकेदुखी वाढणार

जर बिहारमध्ये महायुतीचं सरकार बनू शकतं तर मग कर्नाटकमध्ये काय अडचण आहे ?, देशात एकच राज्यघटना आहे.

  • Share this:

बिहार, 17 मे : गोव्या पाठोपाठ आता बिहारमध्येही आरजेडीने सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. जर कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळतेय तर आम्हालाही सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशी मागणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केलीये.

कर्नाटकमध्ये राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. आम्ही राष्ट्रपतींकडे मागणी करणार आहोत की बिहारमध्ये राज्यपालांनी जनतेचा कौल अमान्य करून सरकार स्थापन करून दिले हा लोकशाहीचा खून आहे. राष्ट्रपतींनी हे सरकार बरखास्त करून सर्वात मोठ्या आरजेडीला सरकार स्थापनेसाठी संधी द्यावी अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.

कर्नाटकामध्ये लोकशाहीचा खून झालाय याच्याविरोधात आम्ही एकदिवशी ठिय्या आंदोलन करणार आहोत. आम्ही राज्यपालांना विनंती करणार आहोत की त्यांनी विधानसभा भंग करावी आणि आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे असंही तेजस्वी यादव म्हणाले.

कर्नाटकात भाजपने राज्यघटनेचा अवमान केलाय. त्यांनीच घोडेबाजाराला प्रोत्साहन दिलंय. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. 'चित भी मेरी आणि पट भी मेरा' असं भाजप करतंय. भाजपने लोकशाहीची थट्टा उडवलीये अशी टीकाही यादव यांनी केली.

जर बिहारमध्ये महायुतीचं सरकार बनू शकतं तर मग कर्नाटकमध्ये काय अडचण आहे ?, देशात एकच राज्यघटना आहे. लोकशाहीत एक सारख्या प्रकरणात वेगळा न्याय नकोय असंही यादव म्हणाले.

भाजप घोडेबाजार करण्यात तरबेज आहे. याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी कर्नाटकात बहुमतासाठी समर्थन कुठून आणणार असा सवालही यादव यांनी उपस्थित केला.

First published: May 17, 2018, 6:53 PM IST

ताज्या बातम्या