Home /News /news /

आम्ही हरलेलो नाही, पुन्हा मतमोजणी करा - तेजस्वी यादव यांची मागणी

आम्ही हरलेलो नाही, पुन्हा मतमोजणी करा - तेजस्वी यादव यांची मागणी

'नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत आमदारांनी महिनाभर पाटणा सोडून जाऊ नये. सरकार आपणच बनविणार आहोत.'

    पाटणा 12 नोव्हेंबर: बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (RJD) अजुनही संघर्षाच्या पावित्र्यात आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवलं गेलं आहे. हिंम्मत असेल तर पुन्हा मतमोजणी करा अशी मागणी तेजस्वी यादव(Tejashwi Yadav) यांनी केली आहे. अतिशय कमी फरकाने 15 ते 20 जागा हरल्याने मोठी संधी गमावल्याची खंत राजदला वाटत आहे. नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन तेजस्वी यादव यांनी गुरुवारी ही मागणी केली. सरकार बनविण्याची आशा आपण सोडलेली नाही असंही त्यांनी आमदारांना सांगितलं आहे. माजी मुख्यमंत्री राबडी यादव यांच्या निवासस्थानी आमदारांची ही बैठक घेण्यात आली होती. नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. आमदारांनी महिनाभर पाटणा सोडून जाऊ नये. सरकार आपणच बनविणार आहोत असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. एनडीएमधल्या घटकपक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं तेजस्वी यादव यांना वाटतं आहे. आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला (Bihar Congress)हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी अजुनही आपल्याला सत्ता स्थापनेची आशा असल्याचा दावा केला आहे. हा दावा करून आमदारांची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर दिल्लीतूनही काही नेते पाटण्यात दाखल झाले असून ते आमदारांची चर्चा करत आहेत. महाआघाडीला 110 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यात राजदला सर्वाधिक 75 जागा, डाव्या पक्षांना 16 तर 70 जागा लढवून काँग्रेसला फक्त19 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर महाआघाडीचं सरकार आलं असतं असंही म्हटलं जात आहे. तर काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पराभव स्वीकारून त्याची कारण शोधली पाहिजेत पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळेच बिहार महाआघाडीपासून वंचित राहिला असंही अन्वर यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Nitish kumar

    पुढील बातम्या