'तेजस' एक्स्प्रेसवर अज्ञातांची दगडफेक

'तेजस' एक्स्प्रेसवर अज्ञातांची दगडफेक

  • Share this:

21 मे : देशातील सर्वात सुपरफास्ट आणि हायटेक 'तेजस' एक्स्प्रेसवर उद्यापासून, म्हणजेच 22 तारखेपासून सर्वसामान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. पण त्याआधी काही अज्ञातांनी दगडफेक करून ट्रेनच्या काही डब्यांच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचं समजतं.

ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगानं धावू शकणारी 'तेजस' एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या पार पडणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वत: 'तेजस'ला हिरवा कंदील दाखवणार आहेत. पण त्याआधी या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. दिल्लीकडून मुंबईकडे ही ट्रेन घेऊन जात असताना त्याच्या काचा फोडल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेल्वेनं कालच 'तेजस'चं वेळापत्रक जाहीर केलं असल्याने यातून पहिल्या प्रवासाबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच आता हा दगडफेकीचा प्रकार घडल्यामुळं खळबळ उडाली आहे.

सुपरफास्ट ‘तेजस’ एक्सप्रेस मुंबई आणि गोव्यात धावणार आहे. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद, आनंद विहार-लखनौ आणि दिल्ली-चंदीगडमध्ये धावणार आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली. ही रेल्वे ताशी 200 किमी वेगाने धावणार आहे. इतक्या वेगाने धावणारी ‘तेजस’ देशातील पहिलीच रेल्वे असणार आहे. मुंबईहून सुटणारी ‘तेजस’ एक्सप्रेस अवघ्या साडेआठ तासांत गोव्यातील करमाळी स्टेशनवर पोहोचेल.

पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये आठवड्यातील तीन दिवस, तर अन्य महिन्यांत आठवड्यातील पाच दिवस 'तेजस' ट्रेनने मुंबई-गोवा प्रवास करता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2017 03:29 PM IST

ताज्या बातम्या