मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Tega Industries IPO Allotment: तुम्हाला मिळाले का या कंपनीचे शेअर्स? या मार्गाने तपासा

Tega Industries IPO Allotment: तुम्हाला मिळाले का या कंपनीचे शेअर्स? या मार्गाने तपासा

टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला (Tega Industries IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान या शेअर्सचे वाटप (Tega Industries IPO Allotment) आज होत आहे

टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला (Tega Industries IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान या शेअर्सचे वाटप (Tega Industries IPO Allotment) आज होत आहे

टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला (Tega Industries IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान या शेअर्सचे वाटप (Tega Industries IPO Allotment) आज होत आहे

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: टेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला (Tega Industries IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान या शेअर्सचे वाटप (Tega Industries IPO Allotment) आज होत आहे. शेवटच्या दिवसापर्यंत या कंपनीचा आयपीओ 219 पटींनी सब्सक्राइब झाला होता. IPO गुंतवणूक करणारे रिटेल गुंतवणूकदार (Investment in IPO) या IPO च्या अलॉटमेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टेगा इंडस्ट्रीज आयपीओ 1 डिसेंबरपासून इश्यू करण्यात आला होता तर 3 डिसेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. कंपनीने 619 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता. या कंपनीच्या आयपीओचे झालेले जोरदार सबस्क्रिप्शन पाहता, 13 डिसेंबर रोजी या शेअरची जबरदस्त लिस्टिंग (Tega Industries Share listing) होण्याची अपेक्षा आहे. तुम्हीही या IPO मध्ये पैसे गुंतवले असतील, तर शेअर अलॉटमेंट कशाप्रकारे समजेल, ते जाणून घ्या.

BSE bseindia.com च्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी  https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या

-Status of Issue Application चे पेज ओपन झाल्यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा

-त्यानंतर Issue Name (Tega Industries IPO)  निवडा

-याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा

-यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

-सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

Link Intime  वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट

-सर्वात आधी तुम्हाला या linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html लिंकवर भेट द्यावी लागेल

-यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा

-यानंतर PAN प्रविष्ट करा

-तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा

-याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल

-तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

जाणून घ्या कंपनीविषयी..

टेगा इंडस्ट्रीज पॉलीमर आधारित मिल लायनर्स बनवणारी देशातील दुसरी मोठी कंपनी आहे. टेगा इंडस्ट्रीजची स्थापना स्वीडनच्या स्केजा एबीच्या सहयोगाने भारतात 1978 साली झाली होती. त्यानंतर मदन मोहन मोहनका यांनी 2001 साली कंपनीतील स्केजा AB कडून संपूर्ण भागीदारी खरेदी केली.

First published:
top videos