मुंबई, ता. 23 जुलै : भांडुप ते नाहूर स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन मधे तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, सर्व गाड्या जलद मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत. कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर याचा परिणाम झाला असून, सर्व गाड्या उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याने लोकं ट्रॅकवरून चालतायत. स्लो ट्रेन्स बंदच असल्यामुळे एकापाठोपाठ एक ट्रेन्स उभ्या आहेत.
मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. सध्याचा मुंबई लोकलचा प्रवास मात्र जीवघेणा झाला आहे. रोज मुंबई लोकलमधून सुमारे ७५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर सरासरी रोज किमान २-३ तास तरी प्रवास करतो. त्यामुळे तुडुंब भरून जाणारी गर्दी, होणारे अपघात, डब्यात होणारी भांडणे हे चित्र कायम आहे. जरा कुठे बिघाड झाला की घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकल खोळंबतात.
शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर
सोमवारी सुद्धा हिच स्थिती उद्भवली. नाहूर-मुलुंड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सर्व गाड्या जलद मार्गावरून वळविण्यात आल्या असून कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या सर्व लोकल उशिराने धावत आहेत. सर्व गाड्या जलद मार्गावरून वळविण्यात आल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम झाला आहे. . ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याने लोकं ट्रॅकवरून चालतायत. स्लो ट्रेन्स बंदच असल्यामुळे भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकांपासून एकापाठोपाठ एक ट्रेन्स उभ्या आहेत
हेही वाचा...
शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या - धनंजय महाडिक
उद्यापासून लोअर परेलचा रोड ओव्हर ब्रीज बंद होणार!
हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल