मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Xiaomiचा 'हा' फोन खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस, नंतर मिळणार नाही अशी संधी

Xiaomiचा 'हा' फोन खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस, नंतर मिळणार नाही अशी संधी

Redmi Note 7 Pro फोन खरेदी करण्यासाठी नंतर मिळणार नाही अशी संधी

Redmi Note 7 Pro फोन खरेदी करण्यासाठी नंतर मिळणार नाही अशी संधी

Redmi Note 7 Pro फोन खरेदी करण्यासाठी नंतर मिळणार नाही अशी संधी

मुंबई, 30 जून : Xiaomiचा पॉप्युलर फोन Redmi Note 7 Proच्या प्रेमात आहात पण अजूनही खरेदीचा तुमचा मुहूर्त ठरलेला नाही. तर आजच घाई करा. कारण ओपन सेलचा आजचा (30 जून) शेवटचा दिवस आहे. नुकतंच कंपनीनं हा फोन ग्राहकांसाठी पाच दिवसांसाठी ओपन सेलमध्ये उपलब्ध करून दिला. जेणेकरून ग्राहक कधीही हा फोन खरेदी करू शकतील, शिवाय यामध्ये फोन 'out of stock' होण्याची समस्या निर्माण होत नाही. पण या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे खरेदी करायचा असेल तर वेळ वाया जाऊ देऊ नका. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची खरेदी 30 जूनपर्यंत कोणत्याही वेळेत केली जाऊ शकते, अशी माहिती कंपनीकडून ट्विटरद्वारे देण्यात आली होती. फ्लिपकार्ट आणि Mi.com साइटवरून तुम्ही हा फोन ऑर्डर करू शकता.

(वाचा : Whatsapp चं नवीन अपडेट आता 'ही' मोठी चूक होणार नाही)

'रेडमी नोट 7 प्रो'चे फीचर्स

या फोनमध्ये तुम्हाला 6.3 इंचाचा (16 सेंटीमीटर) नॉच डिस्प्ले मिळेल. यामधील सर्वात खास गोष्ट म्हणजे फोनच्या बॅक पॅनलवर Aura डिजाइन आहे, ज्यामुळे फोनला एक भन्नाटच लुक मिळला आहे. याशिवाय, फोनच्या दोन्ही बाजूंना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनदेखील आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरआहे. यात 4,000 mAhची बॅटरीदेखील तुम्हाला तुम्हाला मिळेल. याबाबतीत कंपनीनं असा दावा केला आहे की एकाच वेळेस फोन पूर्णपणे चार्ज केल्यास त्याची बॅटरी दोन दिवसांपर्यंत चालते.

(वाचा : Indian Jugad : नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर)

48 मेगापिक्सल कॅमेरा

कॅमेराबाबतीत सांगायचं झालं तर Redmi Note 7 Pro मध्ये ड्युल कॅमरा सेटअप आहे. यामध्ये एफ/ 1.79 अॅपर्चरचं 48 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

शिवाय, यामध्ये एआय सीन डिटेक्शन, एआय पोर्ट्रेट मोड आणि नाइट मोड यासारखे कॅमेरा फीचर्सदेखील आहेत. याव्यतिरिक्त फोनमध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरादेखील आहे.

(वाचा :OnePlus 7 इथे मिळू शकतो मोफत; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप)

फोनची किंमत

भारतात हा फोन दोन प्रकारांमध्ये (Variant) उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज Variantची किमत 13,999 रुपये एवढी आहे तर 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल मेमेरी असलेल्या फोनची किंमत 16,999 रुपये एवढी आहे.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published:

Tags: Xiaomi