मोबाईल गेम्स कंपन्यांना निवडणुकीचा 'फिव्हर'; लाँच केले पॉलिटिकल गेम्स

निवडणुकीचं वातावरण आणखी रंगतदार करण्यासाठी गेम्स कंपन्या उतरल्या निवडणूक रिंगणात

  • Share this:

देशात सद्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निकाल जाहीर व्हायला अजून बराच अवकाश असला तरी, निवडणुकीच्या या रिंगणात आता मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्स बनवणाऱ्या कंपन्याही उतरल्या आहेत. निवडणुकीचा हा आगळा-वेगळा आनंद तुम्हाला 'या' गेम्सच्या माध्यमातून लुटता येईल..

निवडणुकीचं वातावरण आणखी रंगतदार करण्यासाठी काही कंपन्यांनी मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्स बाजारात उतरवले आहेत. हे गेम्स खेळत असताना तुम्ही यासंदर्भातली तुमची माहिती अपडेट करू शकता.

गुगल प्लेस्टोअरवर अनेक गेम्स उपलब्ध आहेत... 1 - 'MPs ki Loot' या खेळात जिंकण्यासाठी तुम्हाला 273 खासदार निवडावे लागतील.

'Modi and Rahul run 2019' या खेळात मोदी किंवा राहुल यांपैकी एक निवडल्यानंतर जिंकण्यासाठी पंजा आणि कमळाची फुलं तुम्हाला गोळा करावी लागतील.

'Modi run 2019' - नोटबंदी, जीएसटी, राफेल अशा काही मुद्यांपासून वाचवत तुम्हाला मोदींना निवडून आणावं लागेल.

'Election War' - मोदी आणि राहुल यांच्यापैकी एक सिलेक्ट करून ते निवडणूक कसे जिंकतील यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

याशिवाय 'Modi and kejriwal run 2019', 'Vote for BJP', 'The Poll'' हे गेम्सदेखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत 8.40 दशलक्ष युवक-युवती पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही युवा मंडळी डोळ्यासमोर ठेऊन गेम्स कंपन्या निवडणूक रिंगणात उतरल्या असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या