दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळा नाहीतर बाहेर बसा, भारताच्या 5 खेळाडूंची खरी 'कसोटी'

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 12:57 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळा नाहीतर बाहेर बसा, भारताच्या 5 खेळाडूंची खरी 'कसोटी'

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही देशांसाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, भारताच्या काही खेळाडूंची संघात स्थान टिकवण्यासाठी कसोटी लागणार आहे.

मर्यादित क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माला कसोटीत मात्र आतापर्यंत फारशी चमक दाखवता आलेली नाही. सराव सामन्यात तो सलामीवीर म्हणून अपयशी ठरला. आता त्याला कसोटीत जास्त संधी मिळणार नाही. याआधी शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, मुरली विजय यांना सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली होती.

अजिंक्य रहाणेनं दोन वर्षांनी कसोटी शतक साजरं केलं. हीच लय कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. परदेशात धावा करणाऱ्या रहाणेला घरच्या मैदानावर मात्र फारसं यश मिळालेलं नाही. कसोटीत 10 शतकं करणाऱ्या रहाणेनं भारतात फक्त 3 शतकं केली आहेत.

गेल्या वर्षी कसोटीतून पदार्पण केलेल्या हनुमा विहारीने मधल्या फळीत आपलं स्थान पक्कं केलं आहे. तो पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. त्याने आतापर्यंत 6 कोसटी खेळल्या असून त्या भारताबाहेर होत्या. त्यानं विंडीजविरुद्ध शतकही साजरं केलं आहे.

भारताच फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या गोलंदाजीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले. याशिवाय फलंदाजीतही त्यानं दम दाखवला आहे. कसोटीत 4 शतकं त्याच्या नावावर आहेत. त्याला विंडीजविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता त्याला कामगिरी उंचावून दाखवावी लागेल.

Loading...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची निवड झाली नव्हती. मात्र, जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने तो बाहेर पडला. त्याच्या जागी उमेश यादवची संघात वर्णी लागली. सध्या संघात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं तर ते टिकवून ठेवण्याचं आव्हान त्याच्यासमोर असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...