पाच वर्ष शिकवलं पण वेतनच नाही, शिक्षकाची आत्महत्या

पाच वर्ष शिकवलं पण वेतनच नाही, शिक्षकाची आत्महत्या

पाच वर्ष झाल्यानंतरही पगार देत नसल्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीय.

  • Share this:

प्रविण तांडेकर, गोंदिया16 ऑगस्ट : अनेक वर्ष विना-अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करूनही वेतन मिळाल नाही त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. केशव गोबाडे असं या शिक्षकाचं नाव आहे. आदिवासी विकास कनिष्ठ महाविद्यालय, मोरगांव ता अर्जुनी जि.गोंदिया इथं गोबाडे हे शिक्षक काम करत होते. पाच वर्ष झाल्यानंतरही पगार देत नसल्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीय.

मोफत 'मिक्सर'ची भाजप आमदाराची घोषणा बेतली महिलांच्या जीवावर

गोबाडे हे गेल्या 5 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर काम करीत होते. आज ना उद्या लवकरच पगार सुरु होईल या आशेवर ते होते. पगार नसल्याने ते अतिशय विवंचनेत होते. परंतु परिस्थिती असहाय्य झाल्याने त्यांनी मृत्युला कवटाळले.  गोबडे यांच्यामागे त्यांची आई,पत्नी आणि दोन मुलं आहेत.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

त्यांची पत्नी आणि मुलं हे आर्थिक विवंचनेमुळे माहेरी राहत असून आई आजारी आहे. हा प्रश्न फक्त एका शिक्षकाचा नाही तर शेकडो शिक्षकांना अशा प्रकारे काम करावं लागतं. जिल्ह्यातील  विना अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या 200 शिक्षकांनी 9 ऑगष्ट पासून गोंदिया जिल्ह्या परिषदेसमोर आंदोलन सुरु केले असून आपल्या मागण्याचं निवेदन भंडारा- गोंदिया पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिलं आहे. मात्र त्याची अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही.

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप असतो, पण...मोहन भागवतांनी उघड केलं मोठं गुपित

आता गोबडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यातल्या शिक्षकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असुन सरकार आणखी किती बळी गेल्यावर अनुदान देण्याच्या विचार करणार असा प्रश्न आता हे  शिक्षक विचारत आहेत. शासनाकडे  गोबडे यांच्या कुटूंबाला 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी केलीय.यासाठी आज गोंदिया जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करत शिक्षकांनी निदर्शने केलीत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 16, 2019, 7:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading