Home /News /news /

नराधम शिक्षक! शाळेतल्या 20 चिमुरड्यांवर केले अनैसर्गिक कृत्य, टेरेसवर दाखवायचा अश्लील VIDEO

नराधम शिक्षक! शाळेतल्या 20 चिमुरड्यांवर केले अनैसर्गिक कृत्य, टेरेसवर दाखवायचा अश्लील VIDEO

गेल्या 6 महिन्यांपासून शिक्षक मुलींवर अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार करत होता.

    नांदेड, 04 फेब्रुवारी : अश्लील व्हिडिओ दाखवून स्वत:ला गुरू म्हणवणाऱ्या नराधम शिक्षकाने तब्बल 20 चिमुकल्या मुलींवर अनैसर्गित कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संपप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला चोप देत शाळेला कुलूप ठोकलं आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शहरातील म्हाळज प्रबोधन शाळेत हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. प्रबोधन शाळेमध्ये फक्त चौथीपर्यंतच वर्ग आहे. गेल्या 6 महिन्यांपासून शिक्षक मुलींवर अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार करत होता. जर कोणालाही याबद्दल सांगितलं तर तुम्हाला इमारतीवरून खाली फेकून देईन अशी धमकी शिक्षकाने चिमुकल्यांना दिली होती. शाळेच्या वरच्या मजल्यावर घेऊन जात नराधम त्यांच्यावर अत्याचार करत होता. इतर बातम्या - 'टाटां'नी रोवली होती एअर इंडियाची मूळं, 88 वर्षांनी आता पुन्हा देणार आधार दरम्यान, या सगळ्या प्रकाराला घाबरून विद्यार्थीनींनी शाळेत जाण्यासाठी नकार दिला. त्या रोज घाबरून राहायच्या. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका पीडित विद्यार्थीनीच्या आईने इतर पालकांशी चर्चा केली आणि घटनेची माहिती मिळवली. संतप्त पालकांनी शाळेमध्ये घुसून शिक्षकाला बेदम चोप दिला. तर शाळेच्या अशा कारभारामुळे शाळेला टाळं ठोकलं. या प्रकरणाची शिक्षकाला विचारणा केली असता त्याने पालकांना उद्धट भाषेत उत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधातबाललैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. इतर बातम्या - हिंगणघाट जळीत प्रकरण : जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितला हा उपाय
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या