S M L

प्राध्यापक की...! परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनींकडून केली शरीरसुखाची मागणी

नाशिकमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे.

Updated On: Sep 19, 2018 02:34 PM IST

प्राध्यापक की...! परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थिनींकडून केली शरीरसुखाची मागणी

नाशिक, 19 सप्टेंबर : नाशिकमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेत पास करण्यासाठी प्राध्यापकांकडून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या पंचवटी कॉलेजमध्ये घडलाय. या प्रकरणात पंचवटी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राध्यापक सचिन सोनवणे आणि प्रवीण सूर्यवंशी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन प्राध्यापकांनी परिक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थीनींकडून शरीरसुखाची मागणी केली. विद्यार्थीनींकडून याचा खुलासा झाला असता प्राध्यापकांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे. पण प्राध्यापकांनीच असं काही केल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अर्थात महिला नेमक्या कुठे सुरक्षित आहे असा प्रश्न पुन्हा एकदा ठळकपणे उपस्थित होतो.

या सगळ्या प्रकाराबद्द्ल प्राध्यापकांनी विचारलं असता, हे आरोप खोटे आहेत. त्यात कुठलंही तथ्य नाही असं प्राध्यापकांचं म्हणणं आहे. याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे यात दोषी आढ़ळल्यास कारवाई होणारच अशी माहिती पंचवटी कॉलेजचे प्राचार्य बापूसाहेब जगदाळे यांनी दिली आहे. 

VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2018 02:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close