S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

चंद्राबाबूंनी उद्धव ठाकरेंना फोनच केला नाही !- तेलगू देसम

शिवसेना आणि तेलगू देशम या एनडीएमधील दोन नाराज घटकपक्षांध्ये चर्चा झाल्याचा बातम्या आज सकाळी प्रसारित झाल्या होत्या पण तेलगू देशमचे खासदार आणि राज्यमंत्री वाय एस चौधरी यांनी उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरून कोणताही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 4, 2018 03:08 PM IST

चंद्राबाबूंनी उद्धव ठाकरेंना फोनच केला नाही !- तेलगू देसम

04 फेब्रुवारी, हैदराबाद : शिवसेना आणि तेलगू देशम या एनडीएमधील दोन नाराज घटकपक्षांध्ये चर्चा झाल्याचा बातम्या आज सकाळी प्रसारित झाल्या होत्या पण तेलगू देशमचे खासदार आणि राज्यमंत्री वाय एस चौधरी यांनी उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरून कोणताही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. पण त्याचवेळी अर्थसंकल्पावरून आम्ही मोदी सरकारवर नाराज असल्याचं सांगायलाही चौधरी विसरले नाहीत. केंद्रीय बजेटमध्ये आंध्रप्रदेशवर अन्याय झाल्याचं तेलगू देसमने म्हटलंय.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आलेले असतानाच एनडीएतील दोन घटकपक्षांची नाराजी समोर आल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता होती. शिवसेनेने स्वबळाची घोषणा करत आधीच वेगळी वाट निवडली आहे. यात भरीस भर म्हणून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अर्थसंकल्पावर नाराजी दर्शवत एनडीएला सोडचिठ्ठी देण्याच्या बातम्या आल्या होत्या पण तुर्तास आम्ही भाजपसोबतच राहणार असल्याचं तेलगू देसम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे भाजपला किमान चंद्राबाबू नायडू यांच्याकडूनही थोडाफार दिलासा मिळाल्याचं दिसतंय पण उद्धव ठाकरेंनी मात्र, स्वबळाचा नारा सुरू ठेवत भाजपवर टीका करणं अजूनही थांबवलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close