जीएसटीमध्ये 'टीसीएस', 'टीडीएस' लागणार नाही

जीएसटीमध्ये  'टीसीएस', 'टीडीएस' लागणार नाही

सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय. तो म्हणजे टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS) आणि टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (TDS) हे दोन प्रावधान काढून टाकायचा निर्णय.

  • Share this:

27 जून : जीएसटी लागू व्हायला दोन तीन दिवस राहिले असताना आता सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय. तो म्हणजे  टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS) आणि टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (TDS) हे दोन प्रावधान काढून टाकायचा निर्णय.

अर्थात हा निर्णय सर्व क्षेत्रांसाठी नाही तर फक्त सरकारी आणि ई -कॉमर्सला लागू होणार आहे.सेंट्रल जीएसटी एक्टच्या सेक्शन51 आणि सेक्शन 52 मध्ये टीडीएस आणि टीसीएस घ्यावे असे नमुद केले गेले होते. आता हे दोन्ही टॅक्स वगळावे असं सरकारचे म्हणणे आहे . ई-कॉमर्समध्ये 2.5 लाखाच्या वरच्या पेमेंटवर 1 टक्का टीसीएस लागणार होता. आता हा टॅक्स लागणार नाही.

याशिवाय 20 लाखाहून कमी टर्न ओव्हर असणाऱ्या कंपन्यांना जीएसटी लागू होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 03:18 PM IST

ताज्या बातम्या