साताऱ्यात विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

साताऱ्यात विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर मल्हार क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय.

  • Share this:

सातारा, 22 सप्टेंबर : साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर मल्हार क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंती कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे साताऱ्यात आले होते. त्यावेळी हे आंदोलन करण्यात आलंय.

पोलिसांनी याप्रकरणी मल्हार क्रांती सेनेचे कार्यकर्ते मारुती जानकर यांना ताब्यात घेतलंय. धनगर समाजाला एसटी आरक्षण आणि सोलापूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे सुद्धा एका कार्यक्रमात तावडेंवर पत्रके आणि भंडारा फेकण्यात आला होता.

आघाडीच्या काळात भाजपनेच धनगर आरक्षणाच्या मागणीला हवा दिली होती. पण सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली तरी काहीच होत नसल्यानं आंदोलकांनी आता भाजप नेत्यांनाच टार्गेट करणं सुरू केलंय.

First published: September 22, 2017, 3:53 PM IST

ताज्या बातम्या