मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

टाटा आणि बिसलेरीमध्ये मोठा करार, डीलमधील 5 गोष्टी ज्या तुम्हाला माहिती हव्यात

टाटा आणि बिसलेरीमध्ये मोठा करार, डीलमधील 5 गोष्टी ज्या तुम्हाला माहिती हव्यात

बिसलेरी आणि टाटामध्ये करार

बिसलेरी आणि टाटामध्ये करार

रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोन या कंपन्याही खरेदी करण्याच्या शर्यतीत होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : मिनिरल वॉटर म्हणजे बिसलेरी असं पटकन आपल्या तोंडात नाव येतं. बिसलरी हे नाव कुणाला माहिती नाही असं नाही. प्रत्येकाला बिसलेरी हे नाव माहिती आहे. आता मिनिरल वॉटर विकणारी कंपनी बिसलेरी लवकरच टाटाची होणार आहे. याबाबत बिसलेरी आणि टाटा यांच्यात एक करार होऊ शकतो. यावर चर्चा सुरू आहे.

मिनरल वॉटरच्या व्यवसायात बिसलेरीचे नाव पुरेसे आहे. टाटा समूहातील कंपनी टाटा ग्राहक उत्पादन बिसलेरी खरेदी करू शकते, अशी माहिती मिळाली आहे. हा करार सुमारे 6000-7000 कोटींमध्ये होऊ शकतो. रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोन या कंपन्याही खरेदी करण्याच्या शर्यतीत होत्या.

CNBC आवाजच्या रिपोर्ट्सनुसार, या करारासंदर्भात टाटा कन्झ्युमर आणि बिस्लेरी यांच्यात दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. या करारासंदर्भात बिसलेरीचे प्रोमोटर रमेश चौहान यांनी टाटा समूहाच्या टॉप मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

बिसलेरी ही नफा कमावणारी कंपनी असल्यामुळे या डीलबाबत बाजारात प्रचंड उत्सुकता आहे. रिपोर्ट्सनुसार, या करारानंतरही सध्याचे व्यवस्थापन 2 वर्ष बिस्लेरीला सांभाळत राहणार आहे.

या आर्थिक वर्षात बिस्लेरीचे उत्पन्न 2,500 कोटी रुपये असून नफा 220 कोटी आहे. या कंपनीचे एकूण 122 प्लांट आहेत जिथे मिनिरल वॉटर तयार केलं जातं, त्यापैकी 13 स्वत: चे प्लांट आहेत. पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये बिस्लेरीचा वाटा 32% आहे.

करारानंतर टाटा कंन्झ्युमर पॅकेज्ड वॉटर ही बाजारातील सर्वात मोठी कंपनी बनेल. टाटा कन्झ्युमरकडे सध्या हिमलियम, टाटा कॉपर प्लस, टाटा ग्लूको प्लस आहेत. देशातील पॅकेज्ड वॉटर मार्केट 20,000 कोटी आहे. पॅकेज्ड वॉटर मार्केटपैकी सुमारे 60 % भाग असंघटित क्षेत्राकडे आहे.

First published:

Tags: Drink water, Tata group, Water