'तारक मेहता..' मालिका सोडण्याचं 'अंजली भाभी'ने सांगितलं कारण, ऐकून बसेल धक्का

'तारक मेहता..' मालिका सोडण्याचं 'अंजली भाभी'ने सांगितलं कारण, ऐकून बसेल धक्का

मालिका सोडल्यानंतरही पहिली अंजली भाभी अर्थात नेहा मेहता सतत चर्चेत आहे. आता नेहा मेहताने एका मुलाखतीदरम्यान केलेल्या एका विधानावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मामधून Taarak Mehta ka ooltah chashmah अनेक जुन्या कलाकारांची एक्झिट झाल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. 12 वर्षांपासून मालिकेत तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणारी नेहा मेहता Neha Mehta अर्थात अंजली भाभीनेही Anjali Bhahi मालिका सोडली. नेहा मेहताच्या जागी, आता सुनैना फौजदार ही अंजली भाभी हे पात्र साकारत आहे.

मात्र, मालिका सोडल्यानंतरही पहिली अंजली भाभी अर्थात नेहा मेहता सतत चर्चेत आहे. आता नेहा मेहताने एका मुलाखतीदरम्यान केलेल्या एका विधानावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'तारक मेहता...मध्ये काम करत होती, म्हणून मी सेलिब्रिटी झाली नाही, तर मी सेलिब्रिटी होते म्हणून तारक मेहता...मध्ये काम करत असल्याचं' तिने म्हटलं आहे.

त्यापुढे नेहाने, सेटवर तिला काम करायचं असेल तर कर नाहीतर सोड, तिच्याजागी नवीन रिप्लेसमेंट आहे, असंही सांगितलं गेल्याचं तिने म्हटलंय. अशावेळी मला माझा सन्मान महत्त्वाचा वाटला आणि मी शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं, ती म्हणाली.

'तारक मेहता...आधीही मी या क्षेत्रात काम केलं आहे. तारक मेहतामुळे मी सेलिब्रिटी बनली नाही. तर मी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तारक मेहता मालिका करत असल्याचं' तिने म्हटलंय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी रोशन सिंह सोढी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंहने मालिका सोडली. त्याआधी तारक मेहताची लीड एक्ट्रेस दिशा वकानी अर्थात दया भाभीनेही शो सोडल्याची चर्चा होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: October 3, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या