तारक मेहता....मालिकेतील 'गोगी'ला जीवे मारण्याची धमकी; तिसऱ्यांदा घडला हा प्रकार

तारक मेहता....मालिकेतील 'गोगी'ला जीवे मारण्याची धमकी; तिसऱ्यांदा घडला हा प्रकार

गोगीला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या आणि शिवीगाळ होत असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये (tarak mehta ka oolta chashma) गोगीची भूमिका साकारणारा आणि कमी कालावधीत लोकप्रिय होत असलेला समय शाह याच्याबाबत एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने सांगितलं की, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याच्यासोबत शिवीगाळही करण्यात आला आहे. अभिनेत्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गोगीला जीवे मारण्याची धमकी

समय शाह याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार 27 ऑक्टोबर रोजी काही लोकांनी त्याच्या मुंबईतील घरात घुसून धमकी दिली. त्या आरोपींविषयी सांगताना तो म्हणाला की, हे लोक दोन दिवसांपूर्वी माझ्या बिल्डिंगमध्ये आले होते. शिवीगाळ करू लागले. मात्र यामागील कारण मला माहीत नाही. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. कुटुंबीय आणि चाहत्यांना याबाबत माहिती व्हावी यासाठी हे शेअर करीत असल्याचे त्याने लिहिलं आहे.

सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद

त्याच्यासोबत तीनवेळा अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सातत्याने त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने कुटुंबीयांसह चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या फूटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 30, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या