Home /News /news /

BREAKING: चर्चमध्ये कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी, तब्बल 20 भाविकांचा मृत्यू

BREAKING: चर्चमध्ये कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी, तब्बल 20 भाविकांचा मृत्यू

मोशीचे जिल्हा आयुक्त किप्पी वारिओबा म्हणाले की, या घटनेत 20 लोक ठार आणि 16 लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले की मृतांमध्ये पाच मुलेही आहेत.

    किलिमंजारो, 02 फेब्रुवारी : टांझानिया (Tanzania) च्या एका चर्चमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकारी याबद्दल पुष्टी केली आहे. किलिमंजारो पर्वताच्या उतारावर मोशीजवळील स्टेडियमवर शेकडो लोक जमले होते. यावेळी, लोकांमध्ये पवित्र तेलापासून अभिषेक घेण्याची स्पर्धा होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मोशीचे जिल्हा आयुक्त किप्पी वारिओबा म्हणाले की, या घटनेत 20 लोक ठार आणि 16 लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले की मृतांमध्ये पाच मुलेही आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मदतीसाठी पोलीस सुरक्षा घटनास्थळी दाखल झाली आहे. वारिओबा पुढे म्हणाले की, पवित्र तेल घेण्यासाठी लोकांनी पळापळ सुरू केली. त्यादरम्यान, मोठी चेंगराचेंगरी झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृतांच्या संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या