नाना पाटेकरांनंतर आता तनुश्रीच्या निशाण्यावर आला अजय देवगण

बॉलिवूडमध्ये दर दिवशी काही ना काही वेगळं ऐकायला मिळतं. MeToo चळवळचं वादळ अजून काही शमलेलं दिसत नाही.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये दर दिवशी काही ना काही वेगळं ऐकायला मिळतं. MeToo चळवळचं वादळ अजून काही शमलेलं दिसत नाही. अभिनेत्री तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये मीटू आंदोलनाला वाचा फोडली.

या सगळ्यात आता तिने आपला मोर्चा अजय देवगणकडे वळवला आहे. तिने अजयच्या आगामी सिनेमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एवढंच नाही तर तनुश्रीने अजय आणि ‘दे दे प्यार दे’ सिनेमाच्या निर्मात्यांना सुनावलंही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजयवर रागवायला झालं तरी काय.. अजयच्या सिनेमातील एका अभिनेत्यावर तनुश्री भडकली आहे.

‘दे दे प्यार दे’ सिनेमात ‘मीटू’च्या आरोपांमध्ये अडकलेले अभिनेते आलोक नाथ यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मीडियावर याआधीच अनेकांनी आलोकला सिनेमात घेतल्याबद्दल राग व्यक्त केला होता. आता तनुश्रीनेही तिच्या मनातली चीड व्यक्त केली.

अजयवर निशाणा साधत तनुश्री म्हणाली की, ‘बॉलिवूडमध्ये सर्व दुतोंडी आहेत. दे दे प्यार दे सिनेमाच्या निर्मात्यांनी तर एका बलात्काराचा आरोप असलेल्या आपल्या सिनेमात घेतलं.’

‘‘मीटू’ चळवळीत अनेक महिलांनी आलोक नाथवर त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. सिनेमात आलोकच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन त्यांच्या सीनचं पुन्हा चित्रीकरण करता आलं असतं. पण त्यांनी असं केलं नाही.’

सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सिनेमाचा लेखक आणि निर्माता लव रंजनला आलोक नाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता, मात्र यावर रंजन याने उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो सोशल मीडियावरही ट्रोल झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या