आई-मावशीमुळे तरुणीवर वारंवार झाले बलात्कार, किडनी स्टोनसाठी तांत्रिकाकडे नेलं आणि....

आई-मावशीमुळे तरुणीवर वारंवार झाले बलात्कार, किडनी स्टोनसाठी तांत्रिकाकडे नेलं आणि....

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक वेळी अल्पवयीन मुलीची आई आणि तिची मावशी तिला या तांत्रिकाकडे घेऊन जात असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

यमुनानगर (हरियाणा), 30 ऑगस्ट : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तांत्रिकाने चिमुरडीवर वारंवार बलात्कार केल्याचं सागंण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक वेळी अल्पवयीन मुलीची आई आणि तिची मावशी तिला या तांत्रिकाकडे घेऊन जात असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या यमुनानगरमध्ये अंधश्रद्धेतून या दोघींना हा प्रकार केल्याचं सांगणात येत आहे. आई आणि मावशी दोघी रोज आपल्या मुलीला तांत्रिककडे पाठवत असत. तंत्र-मंत्रांच्या नावाखाली तांत्रिक गेल्या अनेक दिवसांपासून मुलीवर अत्याचार करत आहे. तो रोज तिच्यावर बलात्कार करायचा असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यावर पुराचं संकट, या जिल्ह्यातील नागरिकांना केलं एलरलिफ्ट

मला त्रास होत आहे, मी संकटात आहे असं वारंवार पीडितेने सांगूनही आईने आणि मावशीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा हे मुलीच्या वडिलांना कळालं तेव्हा त्यांनी पोलिसांकडे या प्रकाराची तक्रारे केली आणि मुलीला न्याय मिळावा यासाठी मागणी केली. पोलिसांनी पोक्सो अ‍ॅक्ट आणि आयपीसी कलम 506 अन्वये भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. यानुसार तांत्रिक आणि पीडित मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे.

आज विकेण्डलाही राज्यात होणार मुसळधार पाऊस, 24 तासांसाठी या शहरांना अलर्ट जारी

नेमकं काय आहे प्रकरणं?

वारंवार पोटात दुखत असल्याचं मुलगी आपल्या आईला सांगत होती. यावर पीडितीचे सोनोग्राफी केली असता तिला किडनी स्टोन झाल्याची माहिती समोर आली. ही बाब आणिने मुलीच्या मावशीला सांगितलं. आपल्या गावात एक देवीचा भक्त आहे. ज्याचं नाव सतीश आहे आणि तो अशा सगळ्या आजारांवर औषधं देतो असं मावशीने सांगितलं. त्यानंतर आई आणि मावशी मुलीसह सतीशकडे गेले. तिथे सतीशने उपचाराच्या बहाण्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 30, 2020, 1:27 PM IST
Tags: rape case

ताज्या बातम्या