Home /News /news /

Shocking! गर्भपाताचं औषध खाऊन शाळेत जायला निघाली, विद्यार्थिनीचा रस्त्यातच मृत्यू 

Shocking! गर्भपाताचं औषध खाऊन शाळेत जायला निघाली, विद्यार्थिनीचा रस्त्यातच मृत्यू 

विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

    चैन्नई, 1 जुलै : तमिळनाडूमधील (Tamil Nadu News) एक बनावटी डॉक्टरकडून घेतलेल्या गर्भपाताचं औषध (Abortion medicine) खाल्ल्यामुळे 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ घडली. 15 वर्षांच्या मुलीली गर्भवती करणाऱ्या तरुणालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तरुणाचं नाव एस मुरुगन असून त्याचं वय 27 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण विद्यार्थिनीला दररोज शाळेत सोडायला जात होता आणि यादरम्यान दोघेही शारिरीकदृष्ट्या जवळ आले. मुलगी गेल्या काही दिवसांपूर्वी गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. यानंतर मुरुगनने आपल्या मित्राच्या मदतीने एका बनावटी डॉक्टरकडून गर्भपाताचं औषध मिळवलं. तरुण मुलीला शाळेत घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेला आणि रस्त्यात तिला गर्भपाताची गोळी दिली. गोळी घेतल्यानंतर जेव्हा दोघेही शाळेच्या दिशेने जाऊ लागले तर मुलगी अचानक बेशुद्ध पडली. यानंतर मुरुगन तातडीने तिला रुग्णालयात घेऊन गेला. दुर्देवाने रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिरुवनमलाईच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं. सध्या पोलीस त्या बनावटी डॉक्टरचा शोध घेत आहेत, ज्याने तिला गर्भपाताची गोळी दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Tamil nadu

    पुढील बातम्या