आईला मेसेज करून घरात गळफास लावून अभिनेत्रीने केली आत्महत्या

आईला मेसेज करून घरात गळफास लावून अभिनेत्रीने केली आत्महत्या

मोहन एका मोबाईल सेंटरमध्ये काम करतो. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • Share this:

चेन्नई, १७ फेब्रुवारी २०१९- तमिळ सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री मेरी शीला जेबरानी उर्फ याशिकाने चेन्नईमधील पेरावल्लूर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येला तिने प्रियकराला दोषी ठरवले आहे. मेरीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिचा प्रियकर मोहन बाबूला दोषी ठरवले आहे. ही सुसाइड नोट तिने आईला व्हॉट्सअप केली. या चिठ्ठीत तिने मोहन बाबूने मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरी आणि मोहन लिव्ह- इनमध्ये राहत होते. मेरी तिरुप्पूर येथील राहणारी असून वाडापजाना येथील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. याचवेळी तिची भेट मोहन बाबूशी झाली. मोहन एका मोबाईल सेंटरमध्ये काम करतो. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मोहनसाठी तिने पेरावल्लूर येथे जीकेएम कॉलनीत एक घर भाड्याने घेतलं आणि तिथे दोघं लिव्ह- इनमध्ये राहू लागले.

शिक्षा नक्की द्या-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही कारणांमुळे मेरी आणि मोहनमध्ये वाद झाले. यानंतर मोहन त्याच्या घरी परतला. एकटेपणात मेरी नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी आईला पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये मेरीने लिहिले की, ‘लग्नाला त्याने नकार दिला आणि मला मानसिक त्रास दिल्यामुळे मी मरण जवळ केलं. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या.’

घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी मोहन बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या मोहनला शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. दरम्यान, मेरीने अनेक तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये आलेल्या मन्नार वागयारा सिनेमात तिची छोटी भूमिका होता. या सिनेमात विमल मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत आनंदी, चांदनी तमलीरसन, प्रभू आणि कार्कित कुमार यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल

First published: February 17, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading