मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Tamarind Leaves Benefits : नैसर्गिकरित्या केस होतील काळे, हे आहेत चिंचेच्या पानांचे 5 आश्चर्यकारक फायदे

Tamarind Leaves Benefits : नैसर्गिकरित्या केस होतील काळे, हे आहेत चिंचेच्या पानांचे 5 आश्चर्यकारक फायदे

चिंचेच्या पानांमध्ये अँटी डँड्रफ आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. चिंचेच्या पानांचा वापर तुम्हाला टाळूच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतो. एवढेच नाही तर केसांची वाढ आणि मजबुती वाढवण्यासही ते मदत करतात.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 जुलै : चिंच केसांसाठी फायदेशीर मानली जाते. बहुतेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये चिंच कायम आढळते आणि विविध कारणांसाठी वापरली जाते. मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने भरलेल्या चिंचेचे केस आणि त्वचेसाठी अगणित फायदे आहेत. आहारात चिंचेचा समावेश केल्याने आरोग्याच्या विविध समस्यांना मदत होऊ शकते, परंतु त्याची पाने केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकतात. चिंचेच्या पानांमध्ये अँटी डँड्रफ आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. चिंचेच्या पानांचा वापर तुम्हाला टाळूच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतो. एवढेच नाही तर केसांची वाढ आणि मजबुती वाढवण्यासही ते मदत करतात.

चिंचेची पाने कशी वापरावी

तुम्ही चिंचेची पाने हेअर पॅक म्हणून वापरू शकता किंवा चिंचेच्या पानांचा स्प्रे बनवू शकता. चिंचेचा स्प्रे बनवण्यासाठी अर्धा कप चिंचेची पाने 5 कप पाण्यात उकळा. ते थंड झाल्यावर केसांवर शिंपडा आणि थोड्या वेळाने केस पाण्याने धुवा. त्याचबरोबर चिंचेच्या पानांचा हेअर मास्क बनवण्यासाठी चिंचेची पाने आणि दही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता ही पेस्ट केसांना लावून डोक्याला मसाज करा. 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

चिंचेच्या पानांचे केसांना होतात हे फायदे...

केस गळणे थांबवते : चिंचेच्या पानांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांना मुळांपासून मजबूत बनवण्यास मदत करतात. केस तुटणे कमी होते. त्याचबरोबर केस लांब आणि दाट होतात.

Heartburn : तळलेले पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळतंय; घरगुती उपायांनी मिळवा आराम

पांढरे केस काळे करते : चिंचेच्या पानांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये असतात. केसांवर चिंचेच्या पानांचा नियमित वापर केल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होऊ शकते.

केस होतात चमकदार : केसांना चमक आणण्यासाठी चिंचेचा हेअर मास्क हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यासाठी चिंचेची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता त्यात मध मिसळून केसांना लावा. काही वेळ राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

टाळूचा अधिक तेलकटपणा दूर होतो : चिंचेची पाने टाळूच्या सेबम उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. यामुळे तुम्हाला अधिक तेलकट टाळूपासून मुक्ती मिळेल.

डायबेटीज रुग्णांनी कोणती फळं खावी? ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी होईल मदत

केस नैसर्गिकरित्या होतील स्ट्रेट : तांदळाच्या पाण्यात चिंचेच्या पानात मिसळून घेतल्याने केस नैसर्गिकरित्या सरळ म्हणजेच स्ट्रेट होण्यास मदत होते.

First published:

Tags: Beauty tips, Health Tips, Home remedies, Lifestyle, Woman hair