'आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका'; लोकसभेत नवनीत राणांची मागणी

'आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका'; लोकसभेत नवनीत राणांची मागणी

6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana)यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : कोरोनाशी लढा यशस्वी करीत अमरावतीच्या खासदार कामात रुजू झाल्या आहेत. आज लोकसभेत त्यांनी केलेल्या विनंतीची मोठी चर्चा सुरू आहे. खासदारांचा पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली आहे. लोकसभेत पावसाळी अधिवेशनानिमित्त बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

आज लोकसभेत संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक 2020 मंजूर केले. यानुसार खासदारांचे 30 टक्के वेतन पुढील वर्षासाठी कापले जाणार आहे.

हे ही वाचा-कोरोनाशी झुंज देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी केली गणपतीची प्रतिष्ठापणा

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून  काढल्या प्रकरणी शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या प्रकरणात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

हे ही वाचा-'मी मरता मरता वाचले,' ICU तून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांचा वेदनादायी अनुभव

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरवरून मुंबईला उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयाला कोरोनाची लागण झाली होती. त्यात नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलं होतं. 6 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana)यांच्यासह त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana) यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला.

Published by: Meenal Gangurde
First published: September 15, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या