रिसर्च म्हणतंय ऑफिसमध्ये जास्त सुट्ट्या घ्या, हे गंभीर आजार होणार नाहीत...| health| Lifestyle| Health tips|

निरोगी आरोग्यासाठी आणि मनाचा ताण कमी करण्यासाठी ऑफिसमधल्या कामापासून सुट्टी घेणं आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:55 PM IST

रिसर्च म्हणतंय ऑफिसमध्ये जास्त सुट्ट्या घ्या, हे गंभीर आजार होणार नाहीत...| health| Lifestyle| Health tips|

मुंबई, जून 27 : रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतः साठी वेळ काढणे खरंच अवघड ठरत आहे. कामाचा व्याप आणि स्वतःसाठी अपुरा वेळ यामुळे अनेक आजार होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग साहजिकच आजारी असताना ऑफिसच्या कामातून सुट्टी घेणं भाग असतं. सततच्या कामाच्या तणावामुळे वारंवार सुट्टी घेणेही शक्य होत नाही. अनेकजण आजारी असतानादेखील सुट्टी घेणे टाळतात आणि आरोग्याशी तडजोड करतात. पण, जर तुम्ही आरामासाठी आणि आरोग्याच्या काळजीपोटी सुट्टी घेत असाल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. एका वैज्ञानिक अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, निरोगी आरोग्यासाठी आणि मनाचा ताण कमी करण्यासाठी सुट्या घेणं आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 'जर तुम्ही ऑफिसमध्ये जास्त सुट्या घेत असाल तर तुम्हाला हृदयसंबंधित विकार होण्याची शक्यता कमी आहे. जर सततच्या कामामुळे थकलेले असाल, स्वतःला वेळ देत नसाल तर ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन तुम्ही फिरायला जाण्याचा प्लान नक्की करा'.

(तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? हे नक्की वाचा)

जितक्या सुट्या तुम्ही जास्त घ्याल तेवढचं मेटाबॉलिज्म सिंड्रोमचा धोका कमी होऊ शकतो. कामाच्या व्यापातून थोडा वेळ दूर राहिल्याने मनाला शांती मिळते, शिवाय मन प्रसन्नदेखील होते. धावपळीपासून शरीराला थोडा आराम मिळतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि कॉलेस्टेरॉलसारख्या समस्याही दूर राहतात. निरोगी, आनंदी राहण्यासोबतच नैराश्याचा आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो.  याशिवाय टाइप-2 या प्रकारचा मधुमेह होण्याचा धोका असतो. अशी माहिती न्यूयॉर्कच्या सिरेक्युज युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात रिसर्चमध्ये समोर आली आहे. फाल्क कॉलेज डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ब्रायस ह्रस्का यांच्या नेतृत्वात हा रिसर्च करण्यात आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,' जे कर्मचारी वर्षभरात वेळोवेळी जास्त सुट्या घेतात त्यांची आजारी होण्याची शक्यता कमी होते. हृदयविकारासारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी कामावरून सुट्टी घ्या आणि मनसोक्त फिरायला जा'.

(निरोगी जगायचं आहे? 'या' 7 पदार्थांचा आहारात करा समावेश)

मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे...

Loading...

मेटाबॉलिक सिंड्रोममुळे हृदयाशी निगडीत आजार, उच्च रक्तदाब, कॉलेस्टेरॉल, मधुमेह हे आजार होण्याचा धोका असतो. कमरेपाशी वाढणारी जास्तीची चरबी या सिंड्रोममुळे होणारा एक परिणाम आहे. टाइप-2 या प्रकारचा मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि नैराश्य अशा समस्या होण्याचा धोका असतो.

VIDEO : 'आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...