मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /काळजी घ्या...उकळत्या पाण्यात पडून ३ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

काळजी घ्या...उकळत्या पाण्यात पडून ३ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

खेळत असताना तीन वर्षांच्या रविराजचा तोल गेला आणि तो उकळत्या पाण्यात पडला.

खेळत असताना तीन वर्षांच्या रविराजचा तोल गेला आणि तो उकळत्या पाण्यात पडला.

खेळत असताना तीन वर्षांच्या रविराजचा तोल गेला आणि तो उकळत्या पाण्यात पडला.

पंढरपूर, 22 फेब्रुवारी : पंढरपुरातून मन हेलावणारी घटना आज समोर आली आहे. पंढरपुरातील एका कुटुंबातील ३ वर्षांच्या मुलाचा उकळत्या पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. रविराज डांगे असं त्या मृत चिमुरड्याचं नाव आहे.  या घटनेमुळे त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे. तरी आजूबाजूच्या परिसरातूनही या घटनेचं दु:ख व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरात चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते आणि शेजारीच तीन वर्षांचा रविराज खेळत होता. खेळता खेळता त्याचा तोल गेला व तो उकळत्या पाण्यात पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यांचे अंग भाजले होते. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घरातील सदस्यांच्या दुर्लक्षाअभावी या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्या घरात लहान मुलं असेल तर अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रविराज याच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ते घरात कुठं फिरतात, चुकून काही तोंडात टाकतात का, याकडे पालकांनी वा घरातील सदस्यांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना

यापूर्वी औरंगाबादमध्येही अशाच पद्धतीची घटना घडली होती. औरंगाबादमध्ये जॉय जोएल उमाप या तीन वर्षांच्या  चिमुरड्याचा उकळत्या पाण्यात पडून मृत्यू झाला होता. ख्रिश्चन धर्मियांच्या इस्टर या सणाच्या दिवशी घरात चिकन बिर्याणीची मेन्यू होता. यासाठी पातेल्यात करण्यात आलेल्या गरम पाण्यात पडून या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जॉयवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

हेही वाचा - तृप्ती देसाई तुला कापून टाकीन...अकोल्याच्या सोमनाथ भोर महारांजांनी दिली धमकी

First published:

Tags: Boiling water, Pandharpur