ताडीला परवाना आणि पोलीस भरतीसाठी आठवी पास !

लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी श्रीमंत सवर्णांसाठी कर लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तर लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने ताडी उद्योग अधिकृत करून त्याला परवाना देण्याची घोषणा जाहीरनाम्यामध्ये केली आहे.

Arti Kulkarni | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 07:29 PM IST

ताडीला परवाना आणि पोलीस भरतीसाठी आठवी पास !

लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी श्रीमंत सवर्णांसाठी कर लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तर लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने ताडी उद्योग अधिकृत करून त्याला परवाना देण्याची घोषणा जाहीरनाम्यामध्ये केली आहे.

त्याचबरोबर, सातवी आणि आठवी पास झालेल्या मुलामुलींना पोलिसांत भरती करण्याचं वचन त्यांनी दिलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले, ताडी विक्रीच्या बद्दल आमची भूमिका नेहमीच वेगळी राहिली आहे. आमचं सरकार आलं तर ताडी पिणं आणि ताडीची विक्री करणं हे दोन्ही मोफत असेल.

तेजस्वी यादव यांनी पाटण्याच्या कार्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमचा जाहीरनामा हा गरिबांच्या कल्याणासाठी आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले. लोकसंख्या वाढीनुसार आरक्षणाचा टक्काही वाढला पाहिजे, असंही त्यांचं म्हणणं आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुरू ठेवण्याला आमचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बिहारींसाठी हेल्पलाइन

2021 मध्ये आम्ही जातीनुसार जनगणना करणार आहोत. बिहारमधल्या लोकांना घरदार सोडून बाहेर जावं लागणार नाही, अशी सुधारणा आम्ही करू हे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. बिहारमधल्या अनिवासी नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल विरुद्ध नितिशकुमार आणि भाजपचं महागठबंधन असा सामना रंगणार आहे. तेजस्वी यादव यांनी दिलेल्या आश्वासनांना मतदार कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागेल. पण ताडीविक्री आणि आरक्षणामुळे हा जाहीरनामा चांगलाच चर्चेत आहे.

तेजस्वी यादव यांचा भाऊ तेजप्रताप यादव यांनी लालू राबडी मोर्चा या नावाने पक्ष काढून स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगत आहेत. ते हॉस्पिटलमध्ये नजरकैदेत असल्याने तेजस्वी यादव हेच पक्षाचा कारभार चालवत आहेत.

================================================================================================================================================================

बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...