डोंबिवली, 21 एप्रिल : दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या तबलिगी जमातीमुळे देशभरात ठिकठिकाणी कोरोनाची प्रादुर्भाव वाढला असल्याची गंभीर बाब समोर आली. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी तबलिगी जमातीचे लोकं आढळून आले. डोंबिवलीमध्ये 25 तबलिगी लोकांना एकत्र ठेवण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबद्दल पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
डोंबिवली,पाथर्ली येथे BSUP जवळपास 25 तबलिगींना ठेवण्यात आले आहे, याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण झाले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या लोकांची भर पडल्यामुळे भीती पसरली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे आणि पूर्वीच्या ठिकाणी क्वारंटाइनन करावे, अशी मागणी राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
हेही वाचा -रस्त्यावर जागोजागी पडले पैसे, पण घाबरून लोकांनी हातही लावला नाही!
आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे की, 'कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. आपल्या इथे हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. डोंबिवली हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता. त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण 25 लोकांना पाथर्ली येथील BSUP त क्वारंटाइन केल्याचे समजले.
डोंबिवली,पाथर्ली येथे BSUP त काही तबलिगींना ठेवण्यात आले आहे अशी माहिती मिळतेय. आधीच कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या डोंबिवलीत या लोकांची उपस्थितीत जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे ही विनंती.@mieknathshinde @KDMCOfficial
— Raju Patil (@rajupatilmanase) April 21, 2020
याच पाथर्ली भागात मागच्याच काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला होता. तसेच येथून जवळच असलेला आजदे, सागर्ली भाग पण हॉटस्पॉट जाहीर केला आहे. त्यानंतरही काही संशयित रूग्ण ज्यामध्ये काही तबलिगी यांचा समावेश आहे,असे एकूण 100 च्या वर लोकं इथं ठेवले आहेत', अशी माहिती पाटील यांनी दिली.
हेही वाचा -...अन्यथा आपण ही या पापात सहभागी, उमा भारतीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
तसंच, 'हॉटस्पॉटमध्ये आढळून आलेले रूग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना, उलट बाहेरचे संशयित या तबलिगींना शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही.' असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.