SaandKiAankh: चक्क 60 वर्षांच्या शूटर दादी झाल्या तापसी- भूमी

SaandKiAankh: चक्क 60 वर्षांच्या शूटर दादी झाल्या तापसी- भूमी

याआधी या सिनेमाचे अनेक फोटो शेअर करण्याच आले होते. पण तापसी आणि भूमीचा चेहरा त्यात दिसत नव्हता.

  • Share this:

मुंबई, १६ एप्रिल- तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर 'सांड की आंख' सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला. याआधी या सिनेमाचे अनेक फोटो शेअर करण्याच आले होते. पण तापसी आणि भूमीचा चेहरा त्यात दिसत नव्हता. अखेर दोघींचा लुक समोर आला असून दोघीही ६० वर्षांच्या आजीची भूमिका साकारत आहेत.

दोघी म्हाताऱ्या दाखवण्यासाठी मेकअपद्वारे त्यांच्या चेहऱ्यावर विशेष काम केलं गेलं आहे. दिवाळीदरम्यान हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं पोस्टरवर स्पष्ट केलं.

'सांड की आंख' सिनेमाचे आतापर्यंत दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर घाघरा आणि कुर्ता घातलेल्या दिसत आहेत. या फोटोला टॅगलाइन देताना लिहिले की, ‘शरीर म्हातारं झालं असेल पण मनं नाही.’

दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, ६० वर्षात ७०० पदकं जिंकली. तापसीने सांड की आंख सिनेमातील तिचा लुक शेअर करताना लिहिले की, ‘या दिवाळीत फटाके नाही तर गोळ्या चालतील.’ भूमीनेही तिचा लुक शेअर करताना लिहिले की, तिच्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात कठीण भूमिकांपैकी ही भूमिका होती.

‘सांड की आंख’ सिनेमात भूमी आणि तापसीशिवाय प्रकाश झा आणि विनीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निधी परमार आणि अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून तुषार हीरानंदानीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading