Home /News /news /

T20 World Cup : भारताचे 'जावई' ठरले पाकिस्तानचे व्हिलन, सेमी फायनलमध्ये बाबरच्या टीमला पराभवाचा धक्का

T20 World Cup : भारताचे 'जावई' ठरले पाकिस्तानचे व्हिलन, सेमी फायनलमध्ये बाबरच्या टीमला पराभवाचा धक्का

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला (Pakistan vs Australia) पराभवाचा धक्का बसला आहे. थरारक अशा या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एक ओव्हर आणि 5 विकेट राखून पराभव केला.

    दुबई, 11 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final) सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला (Pakistan vs Australia) पराभवाचा धक्का बसला आहे. थरारक अशा या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एक ओव्हर आणि 5 विकेट राखून पराभव केला. मॅथ्यू वेडने (Mathew Wade) 17 बॉलमध्ये नाबाद 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. तर मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रन केले. वॉर्नर 30 बॉलमध्ये 49 रन करून आऊट झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्ये पाकिस्तानने सगळ्या 5 मॅच जिंकल्या होत्या. पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला होता, पण नॉक आऊटच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धक्का बसला. या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवाचा व्हिलन ठरला तो भारताचा जावई, म्हणजेच हसन अली (Hasan Ali). ऑस्ट्रेलियाला अखेरच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रनची गरज होती. 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडला. यानंतर मॅथ्यू वेडने आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत मॅच जिंकवून दिली. याआधी हसन अली बॉलिंगमध्येही अपयशी ठरला. हसन अलीने 4 ओव्हरमध्ये तब्बल 44 रन दिल्या. हसन अलीची पत्नी शामिया आरजू भारतीय आहे. 2019 साली हसन आणि शामिया यांचं दुबईमध्ये लग्न झालं. शामिया भारतातल्या हरियाणाची आहे. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातल्या चंदेनी गावात ती राहते. शामिया अमिरात एयरलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनियर आहे. तिचं कुटुंब दिल्लीमध्ये राहतं. पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे विराटची 'जबरा फॅन', भारतासोबत खास नातं शामिया आरजू काही वर्षांपूर्वी हसन अलीला दुबईमध्ये भेटली, तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं आणि मग दोघांनी लग्न केलं. शामियाचे वडील लियाकत अली यांचे बरेच नातेवाईक फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले होते. हसन अली पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू आहे, ज्याने भारतीय मुलीशी लग्न केलं. याआधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनीही भारतीय महिलेशी लग्न केलं होतं. शोएब मलिक याची पत्नी प्रसिद्ध टेनिस स्टार सानिया मिर्झाही भारतीय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये सानिया मिर्झा पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी दुबईच्या स्टेडियममध्ये आली होती. पण शोएब मलिकलाही (Shoaib Malik Sania Mirza) या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. मलिक 2 बॉलमध्ये 1 रन करून आऊट झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या