मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पाकिस्तानच्या पराभवानंतर Team India मध्ये मोठा बदल; 'या' 4 खेळाडूंना मिळू शकतो डच्चू ?

पाकिस्तानच्या पराभवानंतर Team India मध्ये मोठा बदल; 'या' 4 खेळाडूंना मिळू शकतो डच्चू ?

team India

team India

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत टीम इंडियाला (Team India) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 WorldCup)पहिल्यांदाच पराभव स्विकाराव लागला. क्रिकेट जगतात कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) निर्णायवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, संघातून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 26 ऑक्टोबर : पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत टीम इंडियाला (Team India) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 WorldCup)पहिल्यांदाच पराभव स्विकाराव लागला. हा पराभव टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे. क्रिकेट जगतात कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) निर्णायवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, संघातून मोठी अपडेट समोर आली आहे.

भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याचा धोका संभवू शकतो. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या संघात मोठा बदल केला असून चार खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.

'या' चार खेळाडूंना मिळणार डच्चू

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेवनमधून सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांचे स्थान धोक्यात आले आहे. तसेच, वरुण चक्रवर्ती सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. कर्णधार विराट कोहलीचे हे निर्णय चुकीचे ठरले आणि आता संघ निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 मोठे बदल होऊ शकतात, जे पुढीलप्रमाणे आहेत.

सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनची निवड

सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी धोक्याचा ठरत आहे. या खेळाडूचा फ्लॉप शो बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, या खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे भारताला पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सूर्यकुमार यादवला या सामन्यात चौथ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या फलंदाजीच्या स्थानावर संधी देण्यात आले होते. मात्र, त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला नाही. तो 11 धावा करून बाद झाला. त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट सूर्यकुमार यादवला संधी देणार नाही.

सूर्यकुमार यादवच्या जागी ईशान किशनने आपल्या वेगवान फलंदाजीने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे. जर इशान किशन खेळला तर त्याला रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी पाठवले जाऊ शकते आणि केएल राहुलला ओपनिंगमधून चौथ्या क्रमांकावर हलवले जाऊ शकते.

हार्दिक पंड्याच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड

हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून गोलंदाजी करू शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात हार्दिक पांड्याला काही विशेष करता आले नाही. अशा स्थितीत संघाचा समतोल साधण्यासाठी शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

शार्दुल ठाकूरने आयपीएल 2021 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांचा विश्वास जिंकला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी 16 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 25.09 च्या सरासरीने आणि 8.80 च्या इकॉनॉमी रेटने 21 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 3/28 होती.

शार्दुलच्या उपस्थितीने खालची फळी मजबूत होईल. शार्दुलच्या गेल्या 2 वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचे तर तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होता. त्याने 14 डावात 23 विकेट घेतल्या.

वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विन

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात गोलंदाजीत 33 धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीला ब्रेक मिळू शकतो आणि आर अश्विनला संधी मिळू शकते.

भुवनेश्वर कुमारच्या जागी राहुल चहर

भुवनेश्वर कुमारच्या संघाला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला सामना गमावून किंमत मोजावी लागली आहे.

रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची खराब कामगिरी पाहायला मिळाली, जी टीम इंडियाच्या पराभवाचे कारणही ठरली. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 3 षटकात 25 धावा दिल्या.

या काळात भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या जागी राहुल चहरला पुढच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते, जो शानदार लेगस्पिनर आहे. भुवीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएल 2021 च्या 11 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup, Team india, Virat kohli