Home /News /news /

'ही' पाच लक्षणं जाणवत असल्यास सावधान; फुफ्फुसं निकामी होण्याची असू शकते सुरुवात

'ही' पाच लक्षणं जाणवत असल्यास सावधान; फुफ्फुसं निकामी होण्याची असू शकते सुरुवात

मानवी शरीरामध्ये दोन फुफ्फुसं असतात. फुफ्फुसांत थोडीशी जरी समस्या (Lungs Issue) निर्माण झाली, तरी त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो.

    मुंबई, 14 मे : आपल्या शरीरातला (Human Body) प्रत्येक अवयव (Organs) महत्त्वाचा असतो. प्रत्येक अवयवाचं एक ठरावीक कार्य असतं. त्यामुळे एखाद्या अवयवामध्ये बिघाड (Problem) झाला, तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. फुफ्फुस (Lungs) हा मानवी शरीरातल्या सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. मानवी शरीरामध्ये दोन फुफ्फुसं असतात. फुफ्फुसांत थोडीशी जरी समस्या (Lungs Issue) निर्माण झाली, तरी त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. सामान्यपणे श्वासोच्छवास (Breathing) प्रक्रियेमध्ये त्रास जाणवला, तर आपली फुफ्फुसं म्हणजेच लंग्ज नीट काम करत नसल्याचं लक्षात येतं. इतरही अशी अनेक लक्षणं (Symptoms) आहेत जी फुफ्फुसामध्ये बिघाड झाल्यानंतर दिसतात. कोरोना संसर्ग (Corona Infection) होऊन गेलेला असेल तर अशा लक्षणांची माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. 'पत्रिका'नं याबाबतची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फुफ्फुसामध्ये बिघाड झाल्याची माहिती देणारी लक्षणं जाणून घेण्यापूर्वी फुफ्फुसं कशी काम कशी करतात हे आपण समजून घेऊ या. फुफ्फुसं आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide) बाहेर काढून टाकण्याचं काम करतात. म्हणजेच ऑक्सिजन (Oxygen) फिल्टर (Filter) करण्याची जबाबदारी फुफ्फुसांवर असते. ऑक्सिजन फिल्टर करून तो रक्ताद्वारे (Blood) पायापासून ते मेंदूपर्यंत (Brain) पोहोचवण्याचं काम फुफ्फुसं करतात. फुफ्फुस खराब असेल तर कार्बन डायऑक्साइड शरीरातून बाहेर पडू शकत नाही. फुफ्फुस शरीराच्या अंतर्गत भागात असलेला अवयव आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मोठी समस्या निर्माण झाल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये काही तरी बिघाड झाल्याचं लक्षात येत नाही; मात्र काही लहानसहान गोष्टीदेखील फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकतात. 1) छातीमध्ये वेदना होणं - जर अधून-मधून अचानक तुमच्या छातीत दुखत असेल किंवा विनाकारण छातीवर दडपण आल्याचं जाणवत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. हे फुफ्फुसं निकामी होण्याचं एक लक्षण आहे. तुम्हाला खोकताना किंवा शिंकताना तीव्र वेदना होत असतील, तर फुफ्फुसाची एकदा तपासणी करून घेतली पाहिजे. 2) खोकला येणं - सतत खोकला येणं किंवा खोकल्यासोबत कफ (Cough) येणं खराब फुफ्फुसाचं लक्षण आहे. टीबीमुळं (TB) कोरडा खोकलादेखील होऊ शकतो. खोकल्यामध्ये जास्त कफ असल्यास किंवा कफासोबत रक्त येत असेल, तर हे फुफ्फुसाच्या गंभीर समस्येचं लक्षण आहे. क्रॉनिक ब्रॉन्कायटिसची (Chronic Bronchitis) असल्याचं हे लक्षण आहे. 3) श्वास घेण्यास अडचण येणं - जेव्हा तुमची फुफ्फुसं अनहेल्दी (Unhealthy Lungs) असतात, त्यात काही अडचण असते, तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. फुफ्फुसाच्या मदतीनंच तुमचं शरीर ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतं. फुफ्फुस व्यवस्थित काम करत नसेल, तर श्वास घेण्याच्या प्रक्रियेतही व्यत्यय येतो. 4) थकवा जाणवणं - दोन पावलं चालल्यानंतर किंवा साध्या पायऱ्या चढल्यानंतर थकवा जाणवत (Fatigue) असेल, अशक्तपणा आल्याची जाणीव होऊन शरीरातलं त्राण जात असेल, तर हे फुफ्फुसं निकामी झाल्याचं लक्षण आहे. फुफ्फुसामध्ये बिघाड झाला असेल तर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी शरीरातल्या पेशींनादेखील योग्यरीत्या कार्य करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळं शरीरात ऊर्जेची (Energy) कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागतो. 5) सतत वजन कमी होणं - शरीरातला कोणताही भाग खराब असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. जर तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या असेल, तर तुमचं वजन कमी (Weight Loss) होऊ शकतं. अनहेल्दी लंग्जमुळं शरीरात जळजळीची समस्या उद्भवते आणि मसल मास कमी होऊ लागतं. यामुळं वजन कमी होतं. तुम्हालादेखील वरील लक्षणांपैकी एखादं लक्षण जाणवत असेल, तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन फुफ्फुसांची तपासणी करून घ्या.
    First published:

    पुढील बातम्या