अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन, प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन, प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

आपल्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घरावर जाऊन धोंडी काढली. मुंडन करत कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले.

  • Share this:

अमरावती, 17 जुलै- जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सतत दुष्काळ असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी-वरुड या भागातील संत्रा पूर्णपणे सुकला आहे. त्या भागातील आमदार,अमरावतीचे पालकमंत्री व राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावर काहीच उपाययोजना न केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतकरी संघटना यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या घरावर जाऊन धोंडी काढली. मुंडन करत कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले.

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी-वरुड भागातील संत्रा पूर्ण सुखल्यामुळे प्रति संत्रा झाडाला 5 हजार रुपये शासकीय मदत मिळावी, वरुड मोर्शी तालुका ड्रायझोन मुक्त झाला पाहिजे, जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शेतकऱ्यांचे पेरणी ते कापणी हे सर्व कामे नरेगामधून झाली पाहिजे, या सर्व मागण्यांसाठी बुधवारी अनिल बोंडे यांच्या घरावर शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. जिल्ह्यात पाणी येण्यासाठी आंदोलनामध्ये धोंडी सुद्धा काढण्यात आली. शेतकऱ्यांचा रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मुंडन करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात शेतकऱ्याने संपवले

राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघातील बेनोडा शहीद येथील शेतकऱ्याने दुष्काळ व नापिकी, व कर्जाबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र पुंडलिक फरकाडे (वय-55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात गतवर्षी दुष्काळाने कहर केला आणि यंदा अद्याप पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे यंदाही दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याच विवंचनेतून कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील बेनोडा शहीद येथील राजेंद्र फरकाडे या शेतकऱ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी मुलगा, मुलगी शेतात गेले होते. परत येताच घरात गळफास घेतलेल्या मृतदेह त्यांच्या हाती लागला.

फरकाडे कुटुंबाकडे बेनोडा शहीद शेत शिवारात दोन एकर ओलिताची शेती आहे. यात संत्रा, कपाशी, तूरची लागवड केली होती. यावर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने कपाशीची वाढ खुंटली तर इतर पिकाची स्थिती चांगली नाही. शेतासाठी लागलेल्या खर्च देखील निघण्यास तयार नाही. यामुळे बँकेचे असलेले एक लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचं लग्न, शिवाय खासगी उसनवारी आणलेले पैसे देण्याची चिंता राजेंद्र फरकाडे यांना सतावत होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे सरकार बँकेने कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगते. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे.

VIDEO : आम्हाला हिशेब पाहिजे, उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा

First published: July 17, 2019, 5:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading