मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Zomato नंतर आता swiggy ही वादाच्या भोवऱ्यात, डिलिव्हरी बॉय करायचा असं..

Zomato नंतर आता swiggy ही वादाच्या भोवऱ्यात, डिलिव्हरी बॉय करायचा असं..

स्विगी कंपनी दारूची डिलिव्हरी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

    राजकोट,10 जानेवारी: झोमाटो (Zomato) नंतर आता फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (swiggy) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. की राजकोट पोलिसांनी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयसह चौघांना अटक केली आहे. डिलिव्हरी बॉयच्या बॅगेत बीअरचे टीन सापडले आहेत. स्विगी कंपनी दारूची डिलिव्हरी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. डिलिव्हरी बॉय 'मुस्लिम' असल्याने ग्राहकाने पार्सल न घेताच पाठवले परत.. दरम्यान, हैदराबादेत अशीच एक घटना समोर आली होती. स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने ग्राहकाने पार्सल न घेता त्याला परत पाठवले होते. या प्रकरणी संबंधित ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्विगीचा डिलिव्हरी बॉय मुदस्सिर सुलेमान याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती. ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकाने पार्सल घेण्यास नकार दिला होता. मुदस्सिर सुलेमान याने मुस्लिम संघटना मजलिस बचाओ तहरीकचे अध्यक्ष अमजद उल्ला खान यांच्याकडेही या प्रकरणी दाद मागितली होती. काय आहे प्रकरण? मुदस्सिर सुलेमान याने सांगितले की, ग्राहकाने चिकन-65 ची ऑर्डर दिली होती. तसेच कंपनीकडे पार्सल घेऊन हिंदू डिलिव्हरी बॉयला पाठवण्याची विनंती केली होती. परंतु स्विगीने डिलिव्हरी पार्सल मुदस्सिर सुलेमान याच्या हस्ते पाठवले. नंतर ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून पार्सल घेण्यास स्पष्ट नकार देऊन परत पाठवले.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या