मंजुळा मृत्यूप्रकरणी स्वाती साठे यांना चौकशी अधिकारीपदावरून हटवलं

या आरोपींना कायदेशीर आणि आर्थिक मदत करण्यासाठी पोलिस बांधवांनीच पुढे यावं, अशा पद्धतीचं आवाहन स्वाती साठे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवरून केलं होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2017 04:14 PM IST

मंजुळा मृत्यूप्रकरणी स्वाती साठे यांना चौकशी अधिकारीपदावरून हटवलं

मुंबई, 7 जुलै: कारागृह उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांना अखेर मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणातील गुन्ह्याच्या तपास अधिकारी पदावरून हटवण्यात आलंय. या प्रकरणात अटकेत असलेल्या 6 पोलिस कर्मचा-यांना आर्थिक मदत करण्यासाठी वॉट्सअप ग्रुपवरून आवाहन केल्याप्रकरणी तुरुंग महानिरिक्षक स्वाती साठे अडचणीत वादात सापडल्या होत्या. या सगळ्या वादानंतर त्यांनीच स्वतः गृहविभागाला पत्र लिहून तपास अधिकारपदावरून दूर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र. स्वाती साठे यांना थेट कारागृह उपहानिरिक्षक पदावरूनच तात्काल निलंबित करण्याची मागणी केलीय. स्वाती साठे यांनी आरोपी जेलर पोलिसांना आर्थिक मदतीचं आवाहन केल्याची तक्रार ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी गृहविभागाकडे केली होती.

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जेलरसह सहा जेल पोलिसांना अटक करण्यात आलीय. या आरोपींना कायदेशीर आणि आर्थिक मदत करण्यासाठी पोलिस बांधवांनीच पुढे यावं, अशा पद्धतीचं आवाहन स्वाती साठे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवरून केलं होतं. विशेष म्हणजे स्वाती साठे या प्रकरणातील प्रमुख तपास अधिकारी होत्या, तरीही त्या आरोपींना ज्या पद्धतीने मदत करत होत्या, ते पाहता अटक होण्यापूर्वी साठे आरोपींच्या संपर्कात राहून त्यांना मदत करत होत्या का, अशा अनेक मुद्यांवर आता चौकशी होण्याची शक्यता आहे. स्वाती साठेंचा मदतीच्या आवाहनाचा 'मेसेज' वायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झालाय. या मेसेजमध्ये त्यांनी मीडियावरही जोरदार टीका केलीय. व्हॉट्सअॅप ग्रुपवर स्वाती साठे यांनी टाकलेली ही पोस्ट वेगानं व्हायरल झालीय. यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झालाय.

या सगळ्या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय. त्यामुळे मुख्यमंत्री स्वाती साठेंविरोधात नेमकी काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. पण या निमित्ताने कारागृह विभागातलेच वरिष्ठ अधिकारी आरोपी जेलर्सना कशा पद्धतीने पाठिशी घालतात हे पुन्हा उघड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...