वीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू

वीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी स्वाती महाडिक आजपासून खऱ्याअर्थाने भारतीय लष्कराच्या सेवेत रूज झाल्या. चेन्नईच्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांनी लेफ्टनंट पदाची शपथ घेतली.

  • Share this:

सातारा, 9 सप्टेंबर : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी स्वाती महाडिक आजपासून खऱ्याअर्थाने भारतीय लष्कराच्या सेवेत रूज झाल्या. चेन्नईच्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांनी लेफ्टनंट पदाची शपथ घेतली.

संतोष महाडिक यांना 11 नोव्हेंबर 2015रोजी कुपवाड्यात अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात वीर मरण आलं होतं. त्यानंतर या शहीदाच्या पत्नीने अजिबात डगमगून न जाता स्वतः लष्करात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मग तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी खास स्वाती यांच्यासाठी लष्करभर्तीच्या वयाची अट शिथिल करून त्यांना लष्करसेवेत रुजू करून घेतलं. अर्थात स्वाती यांनीही अवघ्या सहा महिन्यात लष्कराच्या सिलेक्शन बोर्डाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर चेन्नईत 11 महिन्याचं खडतर प्रशिक्षण घेतलं. त्यानंतरच स्वाती महाडिक आज लेफ्टनंट पदाची शपथ घेतली.

स्वाती महाडिक यांनी पुणे विद्यापिठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. केवळ आपल्या पतीची देशसेवेची अपूरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या देशसेवेत दाखल झाल्यात. त्यांच्या या धाडसाचं सर्वच सामाजिक थरातून कौतुक होतंय. स्वाती यांचा एक मुलगा पाचगणीत तर मुलगी देहरादूनमध्ये येथे शिक्षण घेत आहेत. कर्नल संतोष यांच्या पत्नी स्वाती यांनी घेतलेला लष्करात दाखल होण्याचा घेतलेला निर्णय हा अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया कर्नल संतोष महाडिक यांचे बंधू धनंजय घोरपडे यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading