Asian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड !

Asian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड !

  • Share this:

जकार्ता, 29 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदर सिंहनंतर भारतासाठी स्वपना बर्मनने इतिहास रचलाय. स्वपना बर्मनने हेप्टाथलन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्वपनाच्या या सुवर्णभरारीमुळे भारताच्या खात्यात अकरावे सुवर्णपदक जमा झाले आहे.

आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला समाधानकारक राहिला. भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर पडलीये. अरपिंदर सिंहने ट्रिपल जंप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अरविंद सिंहने 16.77 मिटर अंतर पार करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.

भारतीय स्प्रिंट क्वीन दुती चंदने दुसरे पदक पटकावले. 100 मीटर शर्यंत जिंकणारी दुती चंद ने 200 मीटर शर्यंतीत रौप्यपदक पटकावले.

तर दुसरीकडे टेबल टेनिसमध्ये मिक्स्ड डबल्समध्ये मनिका बत्रा आणि शरत कमल यांनी कास्यपदक पटकावले. सेफीफायलनमध्ये चीनच्या जोडीकडून पराभूत झाले त्यामुळे कास्यपदकावर समाधान मानावे लागले.

तर बाॅक्सिंगमध्ये भारताचे आणखी एक पदक पक्के झाले आहे. बाॅक्सर अमित पंघल आणि विकास कृष्ण यांनी सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. त्यामुळे कास्यपदक पक्के झाले आहे. पण दोन्ही खेळाडूंकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

First published: August 29, 2018, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading