वादग्रस्त स्वामी ओम बाबाला दिल्लीकरांनी बदडलं

वादग्रस्त स्वामी ओम बाबाला दिल्लीकरांनी बदडलं

  • Share this:

21 मे : 'बिग बॉस'च्या सीझन 10मध्ये सहभागी झालेले आणि नेहमी या ना त्या कारणाने वादात राहणारे स्वामी ओम बाबा यांना दिल्लीत मारहाण झाली आहे.

दिल्लीतील विकासनगर या ठिकाणी नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ओम बाबांना बाबाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आल्याचं पाहून नागरिक चांगलेच संतापले. पूनम नावाच्या महिलेने आधीपासूनच स्वामी ओम बाबांना कार्यक्रमात का बोलावले यावरून वाद घालायला सुरुवात केली. जयंतीसारख्या पवित्र कार्यक्रमात अशा ढोंगी बाबांना बोलावल्यास त्यांना चप्पलेने मारायला हवे, असे तिने म्हटलं.

कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीने स्वामी ओम बाबांबद्दल बोलायला सुरुवात करताच बाबा उठून जात होते. परंतु काही लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. एवढचं नाही, तर मारहाणीनंतरही स्वामी आपल्या गाडीतून जात असताना जमलेल्या लोकांनी गाडीला घेराव घातला. संतापलेल्या नागरिकांनी स्वामी ओम बाबांच्या गाडीचीही तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचा चालक जखमी झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 01:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading