Home /News /news /

सांगलीत ऊस आंदोलन चिघळलं, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऑफिस पेटवलं

सांगलीत ऊस आंदोलन चिघळलं, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऑफिस पेटवलं

आष्टा आणि मिरज तालुक्यातील वड्डीमध्ये ट्रॅक्टरच्या उसाच्या ट्रॉली टायर जाळण्यात आले

    सांगली, ०९ नोव्हेंबर २०१८- ऐन दिवाळीत सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलन चिघळलं. कामेरी इथं राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवलं. तर आष्टा आणि मिरज इथं ऊसाच्या ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीनं जिल्ह्यात रॅली काढून कारखाने बंद करा असं आवाहन केलं होतं. FRP चा विषय सुटत नाही तोपर्यंत कारखाने चालू देणार नाही असा निर्धार स्वाभिमानी संघटनेनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रात्री इस्लामपूर येथील कामेरी गावातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे गट ऑफिस पेटवले. तर आष्टा आणि मिरज तालुक्यातील वड्डीमध्ये ट्रॅक्टरच्या उसाच्या ट्रॉली टायर जाळण्यात आले. एकंदरीतच जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलन पेटले असून, दोन ट्रॅक्टर आणि कारखान्याचे ऑफिस जाळून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्ह्यात रॅली काढून कारखाने बंद करा असे आहवान करण्यात आले होते. याला उत्तर म्हणून कारखानदारांनी आमचा तोडलेला ऊस कारखान्यात आल्यावर बंद करतो असे सांगितलं होतं. यासाठी त्यांनी एक ते दोन दिवसाची मुदत मागितली होती. परंतु एफआरपीचा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही. तोपर्यंत कारखाने चालू देणार नाही असे स्वाभिमानीचे म्हणणे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यत आता ऊस आंदोलन चिघळले आहे. 'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल
    First published:

    Tags: Sangli, Sugarcane, Swabhimani Shetkari Sanghatana

    पुढील बातम्या