मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने घेतला दोघांचा जीव

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने घेतला दोघांचा जीव

मुलं पळविणाऱ्या चोरांच्या टोळीच्या अफवेमुळे औरंगाबाद जिल्हा भयभीत झाला असून या अफवांमुळे आत्तापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, ता,19 जून : औरंगाबाद जिल्ह्यात अफवांचे पीक जोरदार आलय. मुलं पळविणाऱ्या चोरांच्या टोळीच्या अफवेमुळे अख्खा जिल्हा भयभीत झाला आहे. या अफवांमुळे निर्दोष नागरीकांना मारहाणीच्या घटना वाढल्यात. अफवांमुळे आत्तापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वाट्सअॅप वरून मुलं चोरून नेणारी आली आहे अशी अफवा पसरवली जात आहे. मुलांचा प्रश्न असल्याने साहाजिकच सर्व लोक यावर लवकर विश्वास ठेवत आहेत. औरंगाबादेतील वाळूज परिसरात या महिलेला काल मारहाण झाली. या महिलेचा काहीच दोष नाही. ती महिला केवळ अफवांचा बळी ठरलीय. मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवेनं नागरीकांनी या महिलेला बेदम मारहाण केली. ही निष्पाप महिला भाड्याच्या घराच्या शोधात वाळूज परिसरात फिरत होती. पोलीस वेळेत पोहचले म्हणून या महिलेचा जीव वाचला.

अफवेमुळे केवळ महिलेला मारहाण झाल्याची ही एकमेव घटना नाही. पडेगाव परिसरातील नागरीकांनी काही दिवपांपूर्वी दोघा सोंगाड्यांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण केलीय. हे दोघेही ईद निमित्त लोकांकडून इदी मागत होते. मात्र चोर समजून जमावानं या दोघांना बेदम मारहाण केलीय. पोलीसांमुळे या दोघांचेही प्राण वाचले.

तीसरी घटना वैजापुर तालूक्यातील नांदगाव चांदगावची. गावकऱ्यांनी रसत्यानं जाणाऱ्या सहा वाटसरूंना चोर समजून बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांना आपला जीव गमवावा लागला. केवळ अफवांमुळे ग्रामीण भागातील नागरीक भयभीत झालेले आहेत.

गेल्या महिनाभरापासून अफवांचं अक्षरश पेव फुटलंय. या प्रकाराला पोलीसांनी वेळीच पायबंद घातला नाही म्हणून बिथरलेल्या ग्रामस्थांनी निष्पाप नागरीकांना मारहाण केली. अफवांवर वेळीच पायबंद घातला गेला नाही तर अजून बळी जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा...

 जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सरकार बनवायला कुणालाही पाठिंबा देणार नाही, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं केलं स्पष्ट

 काश्मीरमधलं सरकार परिस्थिती हाताळू शकलं नाही- राम माधव

 जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित- संजय राऊत

 

 

First published: June 19, 2018, 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading