अण्णाभाऊ साठे महामंडळ फाईल्स गहाळप्रकरणी व्यवस्थापकाचं निलंबन

अण्णाभाऊ साठे महामंडळ फाईल्स गहाळप्रकरणी व्यवस्थापकाचं निलंबन

  • Share this:

04 मे : अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयातील फाईल्स गहाळप्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांचं निलंबन करण्यात आलंय.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्र महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून चोरून नेण्यात आली आहेत. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात असलेल्या कल्याणी केंद्र या इमारतीतून ही चोरी झाली. त्याच ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय होते. महामंडळाची सर्व कागदपत्र याच इमारतीत आहेत.

२०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला इमारतीच्या तळमजल्यावर गेल्या तीस वर्षांपासून अस्मिता या सामाजिक संस्थेच्या वतीनं अस्थिव्यंग-चिकित्सा व पुनर्वसन केंद्र चालविले जाते.

First published: May 4, 2018, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading