सुष्मिता सेनचं १०व्या बॉयफ्रेंडशीही ब्रेकअप ; बी टाऊनमध्ये सुष्मिताच्या अफेअर्सची चर्चा

सुष्मिता सेनचं १०व्या बॉयफ्रेंडशीही ब्रेकअप ; बी टाऊनमध्ये सुष्मिताच्या अफेअर्सची चर्चा

भिनेत्री सुष्मिती सेनचं लव्ह लाईफ बॉलिवूडला काही नवं नाहीये...याआधीही तिच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या...आताही सुष्मिता सेन आणि रितिक भसीन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय. सुष्मिता रितिक भसीनसोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र नुकतंच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

24 नोव्हेंबर, मुंबई : अभिनेत्री सुष्मिती सेनचं लव्ह लाईफ बॉलिवूडला काही नवं नाहीये...याआधीही तिच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या...आताही सुष्मिता सेन आणि रितिक भसीन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय. सुष्मिता रितिक भसीनसोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र नुकतंच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुष्मिताचा हा दहावा बॉयफ्रेंड होता. आता सुष्मिता आणि रितिक दोघंही सिंगल आहेत.

रितिक हा काही नाईटक्लब्सचा मालक आहे. एवढंच नव्हे तर त्याची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीदेखील आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी रितिकचे मित्र आहेत. एवढं असून देखील सुष्मिता रितिकच्या लव्ह लाईफला पुर्णविराम लागलाय.

सुष्मिताने याआधीही बऱ्याच जणांना डेट केलं आहे. मात्र तिचं एकही रिलेशन जास्त काळ टिकू शकलं नाही. विक्रम भट्ट, रणदीप हुड्डा, वसीम अक्रम, मुदस्सर अजीज, इमतियाज खत्री, मानव मेनन, संजय नारंग, सबीर भाटिया, बंटी सचदेवा यांच्यासोबत सुष्मिताचं अफेअर होतं...

'मी लग्न करु इच्छिते, पण इतर गोष्टींप्रमाणे मी या ही गोष्टीत घाई करणार नाही. एवढंच नव्हे तर माझं लग्न योग्य त्या वेळी होईल' असं सुष्मिताने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. आता लव लाईफसाठी चर्चेत असणारी बॉलिवूडची ही बिनधास्त अभिनेत्री रितिकसोबतच्या या ब्रेकअपनंतर नव्या नात्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत येणार का ? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 09:12 PM IST

ताज्या बातम्या